मुख्य मजकुरावर जा

Molech बद्दल बायबलमधील वचने: Worshiped by the wives of Solomon, and by Solomon

8 वचने · 3 पैलू

Worshiped by the wives of Solomon, and by Solomon बद्दल वचने

  1. शलोमोन राजा, फारोहच्या कन्येशिवाय मोआबी, अम्मोनी, एदोमी, सीदोनी व हिथी या परदेशीय स्त्रियांवर देखील प्रेम करत होता.

  2. हे ते राष्ट्र होते ज्याविषयी याहवेहने इस्राएल लोकांना सांगितले होते, “तुम्ही त्यांच्याशी विवाह करू नये, कारण ते खचितच तुमची मने त्यांच्या दैवतांकडे वळवतील.” तरीही, शलोमोन त्या स्त्रियांच्या प्रेमात फार जडला होता.

  3. त्याला राजकीय घराण्यातील सातशे पत्नी आणि तीनशे उपपत्नी होत्या व त्याच्या पत्नींनी त्याला बहकविले.

  4. तो उतार वयाचा होईपर्यंत, त्याच्या पत्नींनी त्याचे हृदय इतर दैवतांकडे वळविले आणि त्याचा पिता दावीदाप्रमाणे शलोमोनचे हृदय आता संपूर्णपणे याहवेह त्याच्या परमेश्वरास समर्पित नव्हते.

  5. शलोमोन सीदोन लोकांची देवी अष्टारोथ आणि अम्मोनी लोकांचे अमंगळ दैवत मोलेख याची उपासना करू लागला.

  6. याप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते शलोमोनने केले; त्याचा पिता दावीदाने केले त्याप्रमाणे शलोमोन याहवेहला पूर्णपणे अनुसरला नाही.

  7. शलोमोनाने यरुशलेमच्या पूर्वेकडील डोंगरावर मोआबाचे अमंगळ दैवत कमोश व अम्मोनी लोकांचे अमंगळ दैवत मोलख यांच्यासाठी पूजास्थाने बांधली.

  8. आपल्या परदेशीय स्त्रिया, ज्या धूप जाळून आपआपल्या दैवतांना यज्ञ अर्पण करीत होत्या, त्यांच्यासाठी सुद्धा त्याने तसेच केले.