Mercy बद्दल बायबलमधील वचने: Enjoined
Enjoined बद्दल वचने
जेव्हा इस्राएलाच्या राजाने त्यांना पहिले, तेव्हा त्यांनी अलीशाला विचारले, “मी त्यांचा वध करू काय, माझ्या पित्या, मी त्यांचा वध करू काय?”
अलीशाने उत्तर दिले, “त्यांचा वध करू नको. तुम्ही आपल्या तलवारीने किंवा धनुष्याने पकडलेल्यांना माराल का? त्यांच्यापुढे अन्न व पाणी ठेवा म्हणजे ते खाऊन पिऊन तृप्त होतील आणि नंतर त्यांच्या स्वामीकडे परत जातील.”
तेव्हा राजाने त्यांच्यासाठी एक मोठी मेजवानी केली, आणि त्यांचे खाणेपिणे झाल्यानंतर त्यांना पाठवून दिले आणि ते आपल्या स्वामीकडे परत आले. त्यानंतर अरामाच्या टोळ्यांनी इस्राएली देशावर हल्ला करण्याचे थांबविले.
पण तू आपल्या परमेश्वराकडे परत आलेच पाहिजे; प्रीती आणि न्यायाचे पालन कर आणि सतत आपल्या परमेश्वराची प्रतीक्षा कर.
त्याउलट: “तुमचा शत्रू भुकेला असेल, तर त्याला खावयास द्या; तो तान्हेला असेल, तर त्याला प्यावयास द्या. असे केल्याने तुम्ही त्याच्या डोक्यावर निखार्यांची रास कराल.”
वाईटाने जिंकले जाऊ नका, तर चांगल्याने वाईटाला जिंका.
यास्तव, परमेश्वराचे निवडलेले लोक, पवित्र आणि अतिप्रिय या नात्याने करुणा, दया, लीनता, सौम्यता आणि सहनशीलता ही परिधान करा.