मुख्य मजकुरावर जा

Marah बद्दल बायबलमधील वचने: The first station of the Israelites, where Moses made the bitter waters sweet.

6 वचने · 1 पैलू

The first station of the Israelites, where Moses made the bitter waters sweet. बद्दल वचने

  1. मग मोशेने इस्राएली लोकांस तांबड्या समुद्रापासून पुढे शूर नावाच्या रानात आणले. तीन दिवसांच्या रानातील त्यांच्या प्रवासात त्यांना पाणी मिळाले नाही.

  2. मग ते माराह येथे आले, त्याचे पाणी ते पिऊ शकले नाहीत, कारण ते कडू होते. (म्हणूनच त्या ठिकाणाला मारा, म्हणजे कडू असे म्हणतात.)

  3. “आम्ही काय प्यावे?” असे म्हणत लोकांनी मोशेविरुद्ध कुरकुर केली.

  4. तेव्हा मोशेने याहवेहचा धावा केला आणि याहवेहने त्याला लाकडाचा एक तुकडा दाखविला. त्याने तो पाण्यात टाकला आणि पाणी पिण्यास योग्य झाले. त्या ठिकाणी याहवेहने त्यांना पारखण्यासाठी नियम व सूचना दिल्या.

  5. त्यांनी पी-हाहीरोथ सोडले व समुद्र पार रानात गेले आणि एथाम रानातील तीन दिवसांचा प्रवास केल्यानंतर माराह येथे त्यांनी तळ दिला.

  6. त्यांनी माराह सोडले व एलीम येथे गेले, त्या ठिकाणी पाण्याचे बारा झरे व खजुरीची सत्तर झाडे होती. तिथे त्यांनी तळ दिला.