Skip to content

Lust बद्दल बायबलमधील वचने

17 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. “जर माझे हृदय परस्‍त्रीद्वारे भुरळीत झाले असेल, अथवा मी शेजार्‍याच्या दाराशी दडून बसलो आहे,

  2. तर माझी पत्नी परपुरुषाच्‍या घरातील धान्य दळो, आणि इतर माणसे तिच्या अंथरुणात निजो.

  3. कारण ते तर खूपच दुष्ट, आणि दंडास पात्र असे पाप आहे.

  4. हा भस्म करणारा अग्नी आहे; जो माझा हंगाम उपटून टाकेल.

  5. ते तुला तुझ्या शेजार्‍याच्या पत्नीपासून दूर ठेवतात, वाईट स्त्रीच्या लाडिक शब्दांपासून सांभाळतात.

  6. तू मनात तिच्या सौंदर्याबद्दल वासना बाळगू नकोस, किंवा तिच्या नेत्रकटाक्षांमुळे तिला वश होऊ नकोस.

  7. आता ज्यागोष्टी घडल्या, त्या आपल्याला उदाहरणादाखल आणि आपण त्यांच्याप्रकारे आपली हृदये वाईट गोष्टींवर केंद्रित करू नयेत म्हणून घडल्या.

  8. त्यांच्यातील काही मूर्तिपूजक होते, तसे तुम्ही होऊ नका. असे लिहिले आहे: “लोकांनी बसून खाणेपिणे केले व उठून चैनबाजीची मजा घेऊ लागले.”

  9. कारण अशी वेळ येईल जेव्हा लोक शुद्ध शिक्षण स्वीकारणार नाहीत. त्याऐवजी, स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्याभोवती असंख्य शिक्षक एकत्रित करतील जे त्यांच्या कानाची खाज जिरविणारे उपदेश देतील.

  10. ते सत्यापासून आपले कान फिरवतील आणि काल्पनिक कथांकडे वळतील.

  11. परंतु प्रत्येक मनुष्य स्वतःच्याच दुष्ट वासनेने ओढला व भुलविला जाऊन मोहात पडतो.

  12. मग इच्छेने गर्भधारण केल्यानंतर, ती वासना पापाला जन्म देते; आणि पापाची पूर्ण वाढ झाली म्हणजे पाप मरणास जन्म देते.

  13. तुम्हामध्ये लढाया आणि भांडणे कशामुळे उत्पन्न होतात? ज्या इच्छा तुम्हामध्ये लढाई करतात त्यातून नाही काय?

  14. तुम्ही इच्छा करता परंतु तुम्हाला प्राप्त होत नाही, यामुळे तुम्ही वध करता. तुम्ही लोभ धरता, परंतु जे पाहिजे ते तुम्हाला प्राप्त होत नाही, यामुळे तुम्ही भांडता आणि लढता. तुमच्याकडे नाही कारण तुम्ही परमेश्वराकडे मागत नाही.

  15. जेव्हा तुम्ही मागता, तरी तुम्हाला ते मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य हेतूने, विलासाच्या गोष्टींवर खर्च करावा म्हणून मागता.

  16. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे, देहाची वासना, डोळ्याची वासना व जीवनाचा गर्व या सर्वगोष्टी पित्यापासून नाहीत तर जगापासून आहेत.

  17. जग आणि त्याच्या सर्व वासना नाहीशा होतील, परंतु जी व्यक्ती परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करते, ती सदासर्वकाळ जगते.