Locust बद्दल बायबलमधील वचने: Devastation by
Devastation by बद्दल वचने
कुरतडणार्या टोळांनी जे सोडले होते, ते झुंडींनी येणार्या टोळांनी खाल्ले; जे झुंडींनी येणार्या टोळांनी सोडले ते खुरडत चालणार्या टोळांनी खाल्ले; जे खुरडत चालणार्या टोळांनी सोडले ते इतर टोळांनी खाल्ले.
अहो मद्यप्यांनो, जागे व्हा आणि रडा! हे सर्व द्राक्षारस पिणार्यांनो विलाप करा; नवीन द्राक्षारसाकरिता विलाप करा कारण तो तुमच्या ओठातून काढून घेतला आहे.
एक राष्ट्र माझ्या देशावर चालून आले आहे, ते सैन्य बलाढ्य आणि असंख्य आहे; त्यांचे दात हे सिंहाचे दात आहे, त्यांचे सुळे हे सिंहिणीचे सुळे आहेत.
त्या राष्ट्रांनी माझ्या द्राक्षवेलींची नासधूस केली आहेत आणि अंजिराच्या झाडांचा नाश केला आहे. त्यांनी त्याचे खोड सोलून साल दूर फेकली आहे, त्यांच्या फांद्या पांढर्या केल्या आहेत.
पृथ्वीवर आलेले टोळ युद्धासाठी सज्ज केलेल्या घोड्यांसारखे दिसत होते. त्यांचे चेहरे मनुष्यांसारखे असून त्यांच्या डोक्यांवर सोन्याचा मुकुटांसारखे दिसणारे काहीतरी होते.
त्यांचे केस स्त्रियांच्या केसांसारखे होते आणि त्यांचे दात सिंहाच्या दातांसारखे होते.
त्यांनी लोखंडी ऊरस्त्राणासारखी ऊरस्त्राणे घातली होती. त्यांच्या पंखांचा ध्वनी युद्धात त्वेषाने हल्ला करणारे अनेक घोडे व धावत्या रथांच्या ध्वनीसारखा होता.
त्यांना विंचवाच्या नांग्यांसारख्या दंश करणार्या शेपट्या होत्या. पाच महिने लोकांचा छळ करण्याची शक्ती या शेपट्यांत होती.