Skip to content

Life बद्दल बायबलमधील वचने: From God

11 वचने · 10 पैलू

From God बद्दल वचने

  1. “आता पाहा मीच एकमेव आहे तो आहे! माझ्याशिवाय इतर कोणताही ईश्वर नाही. माझ्या आदेशानेच मृत्यू येतो आणि जीवनही मीच प्रदान करतो. मी जखम केली आणि मी ती बरीही करेन, माझ्या हातून सोडविणारा कोणीही नाही.

  2. मी माझा हात स्वर्गाकडे उंचावतो आणि म्हणतो: शपथ माझ्या जीवनाची,

  3. जर त्यांच्या मनास आले आणि आपला आत्मा व श्वास काढून घेतला,

  4. तर सर्व मानवजात एकदम नष्ट होईल आणि मनुष्यप्राणी परत धुळीला जाऊन मिळेल.

  5. हे प्रभू, अशा गोष्टी करून लोक जगतात; आणि माझ्या आत्म्याला त्यांच्यामध्येही जीवन सापडते. तुम्ही माझे आरोग्य पुनः प्रदान केले आहे आणि मला जीवन दिले आहे.

  6. अशा मनोवेदना मी सहन करणे निश्चितच माझ्या भल्याचे होते. तुमच्या प्रेमाखातर तुम्ही मला नाशाच्या गर्तेपासून वाचविले; तुम्ही माझी सर्व पापे तुमच्या पाठीमागे टाकली आहेत.

  7. कारण अधोलोक तुमची स्तुती करू शकत नाही, मृत्यू तुमचे स्तुतिगान करू शकत नाही. जे खाली गर्तेत जातात ते तुमच्या विश्वासूपणाची आशा करू शकत नाहीत.

  8. जिवंत, जे जिवंत आहेत—ते तुमची स्तुती करतात, जसे मी आज करीत आहे; पालक त्यांच्या मुलांना तुमच्या विश्वासूपणाबद्दल सांगतात.

  9. याहवेह मला वाचवतील, आणि आपण याहवेहच्या मंदिरात आपल्या आयुष्याचे सर्व दिवस तंतुवाद्याच्या साहाय्याने गाणी गात राहू.

  10. मानवी हात त्यांच्या गरजा भागवू शकत नाहीत, कारण त्यांना कशाचीही गरज नाही. ते प्रत्येकाला जीव आणि श्वास व लागणारे सर्वकाही पुरवितात.

  11. त्यांनी एका मनुष्यापासून सर्व राष्ट्रे उत्पन्न केली, त्यांनी सर्व पृथ्वीवर निवास करावा असे केले आणि इतिहासामध्ये त्यांचे नेमलेले समय व त्यांच्या निवासांच्या निश्चित सीमा त्यांनी आधी नेमल्या होत्या.