Lahai-Roi बद्दल बायबलमधील वचने: Hagar fled to
Hagar fled to बद्दल वचने
शूर गावाच्या वाटेवर रानातील एका झर्याजवळ ती याहवेहच्या एका दूताला आढळली.
तो तिला म्हणाला, “अगे हागारे, सारायची दासी, तू कुठून आलीस आणि कुठे चाललीस?” हागारेने उत्तर दिले, “मी माझी मालकीण साराय हिच्यापासून पळून जात आहे.”
तेव्हा याहवेहचा दूत तिला म्हणाला, “तू तुझ्या मालकिणीकडे परत जा आणि तिच्या अधीनतेत राहा.”
दूत पुढे म्हणाला, “मी तुझा वंश इतका वाढवेन की त्यांची मोजणी करता येणार नाही.”
याहवेहच्या दूताने तिला आणखी म्हटले, “आता तू गर्भवती आहेस आणि तुला एक पुत्र होईल. तू त्याचे नाव इश्माएल असे ठेव, कारण याहवेहने तुझे दुःख ऐकले आहे.
तो रानगाढवासारखा एक मनुष्य होईल; त्याचा हात प्रत्येकाच्या विरुद्ध असेल व प्रत्येकाचा हात त्याच्याविरुद्ध होईल; आणि तो आपल्या सर्व भाऊबंदांमध्ये शत्रुतापूर्ण वातावरणात वस्ती करून राहील.”
तिच्याशी बोलणार्या याहवेहला तिने हे नाव दिले: “मला पाहणारे परमेश्वर तुम्हीच आहात,” कारण ती म्हणाली, “जे मला पाहात आहेत, त्यांना मी आता पाहिले आहे.”
म्हणूनच त्या विहिरीला बएर-लहाई-रोई असे नाव पडले. जी कादेश व बेरेद यांच्या दरम्यान आहे.