मुख्य मजकुरावर जा

Jehoiachin बद्दल बायबलमधील वचने

31 वचने · 10 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. नबुखद्नेस्सरने यरुशलेमहून बाबेलला बंदिवासात नेलेल्या लोकांपैकी अवशेष वडीलजनांना, याजकांना, संदेष्ट्यांना व इतर सर्व लोकांना यिर्मयाहने लिहिलेल्या पत्राचा हा मजकूर आहे.

  2. (राजा यकोन्याह, राजमाता, न्यायालयातील अधिकारी, यहूदाहचे व यरुशलेमचे अधिकारी व कारागीर अशा सर्वांना यरुशलेमहून बाबेलला बंदिवासात नेण्यात आले होते.)

  3. यहूदीयाचा राजा यहोयाखीन याच्या बंदिवासातील सदतिसाव्या वर्षी, एवील-मरोदख हा बाबेलचा राजा झाला. त्याच्या कारकिर्दीत, बाराव्या महिन्याच्या पंचविसाव्या दिवशी त्याने यहूदीयाचा राजा यहोयाखीनला मुक्त केले व तुरुंगातून बाहेर काढले.

  4. तो त्याच्याशी कृपेने बोलला आणि त्याचे राजासन जे राजे त्याच्यासोबत बाबिलोन येथे होते त्यांच्या राजासनापेक्षा उंच केले.

  5. यहोयाखीनने तुरुंगातील कपडे वेगळे ठेवले आणि त्याने आयुष्यभर राजाच्या मेजावर भोजन केले.

  6. यहोयाखीन जिवंत असेपर्यंत बाबेलचा राजा त्याला प्रती दिवस तो मरेपर्यंत नियमित पुरवठा देत असे.