मुख्य मजकुरावर जा

Jehoiachin बद्दल बायबलमधील वचने: Nebuchadnezzar invades his kingdom, takes him captive to Babylon

9 वचने · 10 पैलू

Nebuchadnezzar invades his kingdom, takes him captive to Babylon बद्दल वचने

  1. त्याच्याच कारकिर्दीत बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या सैन्याने यरुशलेमावर स्वारी करून शहरास वेढा दिला,

  2. आणि त्याचे अधिकारी हा वेढा घालत असताना बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर स्वतः शहरात आला.

  3. यहूदीयाचा राजा यहोयाखीन, त्याची आई, त्याचे सेवक, त्याच्या राजघराण्यातील सेवक आणि त्याचे अधिकारी हे सर्व त्याला शरण गेले. बाबेलचा राजाच्या कारकिर्दीच्या आठव्या वर्षी, त्याने यहोयाखीनला कैदी बनविले.

  4. याहवेहने घोषणा केल्याप्रमाणे, नबुखद्नेस्सरने याहवेहच्या मंदिरातील व राजवाड्यातील सर्व संपत्ती लुटून नेली आणि इस्राएलाच्या शलोमोन राजाने याहवेहच्या मंदिरासाठी ठेवलेले सोन्याचे कटोरे तोडून त्यांचे तुकडे केले.

  5. यरुशलेम येथील लोक त्याने बंदिवासात नेले: सर्व अधिकारी आणि लढाऊ पुरुष आणि सर्व कुशल कामगार आणि कारागीर—एकूण दहा हजार. देशात फक्त सर्वात गरीब लोक उरले.

  6. नबुखद्नेस्सर यहोयाखीनला बंदी करून बाबेलला घेऊन गेला. त्याने राजाची आई, त्याच्या पत्नी, त्याचे अधिकारी आणि देशातील प्रतिष्ठित लोकांना देखील यरुशलेमहून बाबेलला नेले.

  7. बाबेलच्या राजाने युद्धासाठी सक्षम आणि बलवान योद्धांचे संपूर्ण सात हजार सैन्य आणि एक हजार कुशल कारागीर आणि लोहार बाबेलला नेले.

  8. नबुखद्नेस्सरने यरुशलेमहून बाबेलला बंदिवासात नेलेल्या लोकांपैकी अवशेष वडीलजनांना, याजकांना, संदेष्ट्यांना व इतर सर्व लोकांना यिर्मयाहने लिहिलेल्या पत्राचा हा मजकूर आहे.

  9. (राजा यकोन्याह, राजमाता, न्यायालयातील अधिकारी, यहूदाहचे व यरुशलेमचे अधिकारी व कारागीर अशा सर्वांना यरुशलेमहून बाबेलला बंदिवासात नेण्यात आले होते.)