Immortality बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
‘मनुष्य परमेश्वरापेक्षा नीतिमान असू शकतो काय? बलवान मनुष्य त्याच्या उत्पन्नकर्त्यापेक्षा अधिक शुद्ध असू शकतो काय?
जर परमेश्वर आपल्या सेवकांवर भरवसा ठेवत नाही, जर तो आपल्या दूतांवर दोषारोप करतो,
तर मग जे मातीच्या घरात राहतात, ज्यांचा पाया धुळीत आहे, जे पतंगा समान चिरडले जातात, त्यांच्यावर परमेश्वर भरवसा ठेवील काय?
पहाटेपासून संध्याकाळपर्यंत त्यांचे तुकडे होतात; कोणाच्या लक्षात न येताच ते सर्वकाळासाठी नष्ट होतात.
त्यांनी ज्ञानाविनाच मरून जावे म्हणून, त्यांच्या डेर्याचे दोर आतूनच कापले जात नाही काय?’
कारण तुम्ही मला अधोलोकात राहू देणार नाही; किंवा तुमच्या विश्वासणार्याला तुम्ही कुजणे पाहू देणार नाही.
तुम्ही मला जीवनाचा मार्ग दाखवाल; तुमच्या समक्षतेत तुम्ही मला हर्षाने भराल, तुमच्या उजव्या हातात सर्वदा सौख्य आहे.
कोणत्याही व्यक्तीस इतर व्यक्तीचा उद्धार करण्यासाठी खंडणी भरता येत नाही; किंवा त्याच्या जिवाची खंडणी तो परमेश्वराला भरून देऊ शकत नाही.
कारण मनुष्याच्या जिवाच्या खंडणीचे मोल फार मोठे आहे, कोणतेही पैसे कधीही पुरेसे होत नाहीत—
जेणेकरून त्यांनी सर्वदा जिवंत राहावे आणि कबरेचा अनुभव त्यांना येऊ नये.
ते आपल्या कबरांमध्ये मेंढरांप्रमाणे पडून राहतात; मृत्यू त्यांचा मेंढपाळ होईल (प्रातःकाळी नीतिमान लोक प्रभुत्व करतील) त्यांचे देह कबरेत उतरतील, कारण त्यांना कोणताच आधार राहिला नाही.
परंतु परमेश्वर मला मृत्यूच्या सामर्थ्यापासून सोडवतील आणि माझा स्वीकार करतील. सेला
पण मी त्यांना आरोळी मारली: “हे परमेश्वरा, आयुष्याच्या मध्यातच मला मृत्यू येऊ देऊ नका; तुमची वर्षे पिढ्यान् पिढ्या निरंतर असतात.
प्रारंभी पृथ्वीचा पाया तुम्हीच घातला, आणि आपल्या हातांनी तुम्ही गगनमंडळे निर्माण केलीत.
ती नष्ट होतील, परंतु तुम्ही निरंतर राहाल; ती सर्व जुन्या वस्त्राप्रमाणे जीर्ण होतील; जुनी वस्त्रे टाकून नवी घालावी, तसे तुम्ही त्यांना बदलून टाकाल.
परंतु तुम्ही निरंतर समान राहणार, आणि तुमची वर्षे कधीही संपुष्टात येणार नाहीत.
तुमच्या सेवकांचे संतान तुमच्या उपस्थितीत टिकून राहतील; तुमच्या संरक्षणाखाली त्यांच्या वंशजांचे जतन होईल.”
एक स्तवनगीत. दावीदाची रचना. हे माझ्या परमेश्वरा, माझ्या राजा, मी तुमचे स्तवन करेन; तुमच्या नावाचे सदासर्वदा गुणगान करेन.
प्रतिदिनी मी तुमचे स्तवन करेन आणि तुमच्या नावाचे सदासर्वदा गुणगान करेन.
कारण अधोलोक तुमची स्तुती करू शकत नाही, मृत्यू तुमचे स्तुतिगान करू शकत नाही. जे खाली गर्तेत जातात ते तुमच्या विश्वासूपणाची आशा करू शकत नाहीत.
जिवंत, जे जिवंत आहेत—ते तुमची स्तुती करतात, जसे मी आज करीत आहे; पालक त्यांच्या मुलांना तुमच्या विश्वासूपणाबद्दल सांगतात.
पृथ्वीच्या धुळीत झोपलेले बरेच लोक जागे होतील: काहीजण सर्वकाळच्या जीवनासाठी तर काही निर्लज्जता व सर्वकाळच्या अपमानासाठी उठतील.
जे सुज्ञ आहेत ते आकाशातील प्रकाशासारखे प्रज्वलित होतील. तसेच अनेकांना नीतिमार्गाकडे वळवणारे सदासर्वकाळ तार्यांप्रमाणे चकाकतील.
आता एक मनुष्य येशूंकडे आला व त्यांना विचारले, “गुरुजी, सार्वकालिक जीवन मिळविण्याकरिता मी कोणत्या चांगल्या गोष्टी कराव्या?”
तेव्हा येशूंनी त्याला म्हटले, “तू मला उत्तम काय आहे हे का विचारतोस? फक्त परमेश्वरच खर्या अर्थाने उत्तम आहेत. पण तू आज्ञा पाळ म्हणजे तुला जीवनात प्रवेश मिळेल.”