मुख्य मजकुरावर जा

Heart बद्दल बायबलमधील वचने: Known to God

17 वचने · 2 पैलू

Known to God बद्दल वचने

  1. संगीत दिग्दर्शकाकरिता दावीदाची रचना. एक स्तोत्र. याहवेह, तुम्ही मला पारखले आहे आणि मला ओळखले आहे.

  2. माझे बसणे व माझे उठणे तुम्ही जाणता; दुरून देखील तुम्हाला माझा प्रत्येक विचार समजतो.

  3. माझे जाणे-येणे व विश्रांती घेणे, हे देखील तुम्ही ओळखून आहात; माझ्याबद्दलची प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहीत आहे.

  4. हे याहवेह, माझ्या जिभेवर शब्द येण्यापूर्वीच, ते सर्व तुम्हाला माहीत असतात.

  5. तुम्ही माझ्यापुढे व मागे, माझ्या सभोवती असता; तुम्ही आपला हात माझ्या मस्तकावर ठेवला आहे.

  6. हे ज्ञान इतके भव्य व अद्भुत आहे, की इतक्या उदात्ततेपर्यंत पोहोचणे मला अशक्य आहे.

  7. तुमच्या आत्म्यापासून दूर मी कुठे जाऊ? तुमच्या समक्षतेपासून दूर मी कुठे पळू?

  8. मी वर स्वर्गात गेलो, तरी तिथे तुम्ही आहात; अधोलोकात माझे अंथरूण केले, तर तिथेही तुम्ही आहातच.

  9. मी पहाटेच्या पंखांवर स्वार होऊन अत्यंत दूरच्या महासागरापलिकडे वस्ती केली,

  10. तर तिथेही तुमचा हात मला धरून चालवील; तुमचा उजवा हात मला आधार देईल.

  11. मी म्हणालो, “अंधार मला लपवून टाकेल, आणि माझ्या सभोवतीचा प्रकाश रात्रीत बदलून जाईल,”

  12. अंधकार देखील तुमच्यापुढे अंधकार नाही, कारण तुमच्यापुढे रात्र दिवसासारखीच प्रकाशमान आहे; कारण अंधकार हा तुम्हाला प्रकाशासमान आहे.

  13. मी त्यांना अविभाजित हृदय देईन आणि त्यांच्यात नवीन आत्मा घालेन; मी त्यांच्यामधून त्यांचे दगडरुपी हृदय काढून त्यांना मांसमय हृदय देईन.

  14. तेव्हा ते माझे विधी आचरणात आणतील व काळजीपूर्वक माझे नियम पाळतील. ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा परमेश्वर होईन.

  15. परंतु ज्यांची हृदये त्यांच्या व्यर्थ प्रतिमा व अमंगळ मूर्तींकडे लागलेली आहेत, त्यांनी केलेल्या कृत्यांना मी त्यांच्याच डोक्यावर पाडीन, असे सार्वभौम याहवेह घोषित करतात.”

  16. मी तुमच्यावर स्वच्छ पाणी शिंपडेन, आणि तुम्ही शुद्ध व्हाल; मी तुम्हाला तुमच्या सर्व अशुद्धतेपासून आणि तुमच्या मूर्तींपासून शुद्ध करेन.

  17. मी तुम्हाला नवे हृदय देईन आणि तुमच्यात नवा आत्मा ओतेन; मी तुमच्यातून तुमचे पाषाणी हृदय काढून मांसमय हृदय तुम्हाला देईन.