Skip to content

Hannah बद्दल बायबलमधील वचने

42 वचने · 5 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. आणि हन्ना त्याला म्हणाली, “माझ्या स्वामी, मला क्षमा करा. तुमच्या जीविताची शपथ, मी तीच स्त्री आहे जी येथे तुमच्या बाजूला उभी राहून याहवेहकडे प्रार्थना करीत होती.

  2. या बाळासाठी मी प्रार्थना केली, आणि याहवेहकडे मी जे मागितले त्यांनी ते मला दिले आहे.

  3. तर मी आता त्याला याहवेहला समर्पित करीत आहे. त्याचे संपूर्ण जीवनभर तो याहवेहसाठी दिलेला आहे.” आणि त्याने तिथे याहवेहची उपासना केली.

  4. तेव्हा हन्नाहने प्रार्थना केली आणि म्हणाली: “माझे हृदय याहवेहमध्ये आनंद करीत आहे; याहवेहमध्ये माझे शिंग उंच केलेले आहे. माझे मुख माझ्या शत्रूंपुढे बढाई मारते, कारण याहवेहने दिलेल्या उद्धारात मी आनंद करते.

  5. “याहवेहसारखे कोणीही पवित्र नाही; तुमच्याशिवाय दुसरे कोणीही नाही; आमच्या परमेश्वरासारखा दुसरा कोणताही खडक नाही.

  6. “फार गर्वाने बोलत राहू नका, किंवा तुमच्या मुखाला उद्धट बोलणे करू देऊ नका, कारण ते याहवेह परमेश्वर आहेत जे सर्वज्ञानी आहेत, आणि त्यांच्याद्वारे कृत्ये तोलली जातात.

  7. “योद्ध्यांचे धनुष्य तुटलेले आहेत, परंतु जे अडखळले, ते शक्तीने सज्ज झाले आहेत.

  8. ज्यांच्याकडे भरपूर होते ते आता अन्नासाठी मजुरी करीत आहेत, परंतु जे भुकेले होते ते आता भुकेले नाहीत. जी अपत्यहीन होती तिने सात लेकरांना जन्म दिला आहे, परंतु जिला अनेक मुले होती ती क्षीण झाली आहे.

  9. “याहवेह मृत्यू आणतात आणि जिवंतही करतात; ते कबरेत घेऊन जातात आणि तिथून वरही काढतात.

  10. गरिबी आणि संपत्ती याहवेह पाठवितात; ते नम्र करतात आणि उंचही तेच करतात.

  11. ते दीनांस धुळीतून वर काढतात, आणि गरजवंतास राखेच्या ढिगार्‍यातून वर उचलून घेतात; ते त्यांना राजपुत्रांबरोबर बसवितात, आणि त्यांना वतन म्हणून सन्मानाचे आसन प्राप्त होते. “कारण पृथ्वीचा पाया याहवेहचा आहे; त्यावरच त्यांनी जग स्थापले आहे.

  12. ते आपल्या प्रामाणिक सेवकांची पावले सांभाळतील, परंतु दुष्ट अंधकारमय ठिकाणी शांत केले जातील. “कोणीही बळाने विजय पावत नाही;

  13. जे याहवेहचा विरोध करतात त्यांचा चुराडा होईल. सर्वश्रेष्ठ याहवेह स्वर्गातून गर्जना करतील; पृथ्वीच्या शेवटचा न्याय याहवेह करतील. “ते आपल्या राजाला सामर्थ्य देतील, आणि आपल्या अभिषिक्ताचे शिंग उंच करतील.”

  14. परंतु शमुवेल बालक तागाचे एफोद घालून याहवेहसमोर सेवा करीत होता.

  15. प्रत्येक वर्षी जेव्हा त्याची आई तिच्या पतीबरोबर वार्षिक यज्ञ करण्यासाठी जात, तेव्हा त्याच्यासाठी एक लहान झगा बनवून ती त्याला देत असे.

  16. एलकानाह आणि त्याची पत्नी यांना एली आशीर्वाद देताना म्हणे, “या स्त्रीने ज्याच्यासाठी प्रार्थना केली आणि याहवेहला दिले त्याच्या बदल्यात या स्त्रीपासून याहवेह तुला लेकरे देवो.” त्यानंतर ते त्यांच्या घरी जात असत.

  17. आणि हन्नाहवर याहवेहची कृपा होती; तिने तीन मुलांना आणि दोन मुलींना जन्म दिला. याकाळात शमुवेल बाळ याहवेहच्या उपस्थितीत वाढत गेला.