Hannah बद्दल बायबलमधील वचने: Samuel born to, dedicates him to God, leaves him at the temple
Samuel born to, dedicates him to God, leaves him at the temple बद्दल वचने
दुसर्या दिवशी सकाळी त्यांनी उठून याहवेहची उपासना केली आणि परत रामाह येथे आपल्या घरी परतले. एलकानाहने आपली पत्नी हन्नाह हिच्याशी प्रीतिसंबंध केला आणि याहवेहने तिची आठवण केली.
तेव्हा नेमलेल्या काळात हन्नाह गर्भवती झाली आणि एका पुत्राला जन्म दिला. तिने त्याचे नाव शमुवेल असे ठेवले, ती म्हणाली, “कारण याहवेहकडे मी याला मागितले होते,”
जेव्हा तिचा पती एलकानाह त्याच्या सर्व कुटुंबाबरोबर याहवेहसाठी वार्षिक यज्ञ अर्पण करण्यासाठी आणि त्याचा नवस पूर्ण करण्यासाठी गेला,
तेव्हा हन्नाह गेली नाही. ती तिच्या पतीला म्हणाली, “मुलाचे दूध तोडल्यानंतर, मी त्याला घेऊन जाईन आणि त्याला याहवेहसमोर सादर करेन आणि तो सदैव तिथेच राहील.”
“तुला जे उत्तम वाटते ते तू कर,” तिचा पती एलकानाह तिला म्हणाला. “त्याचे दूध तुटेपर्यंत तू येथेच राहा; याहवेह त्यांच्या वचनाप्रमाणे करो.” म्हणून ती स्त्री घरीच राहिली आणि मुलाचे दूध तोडेपर्यंत तिने त्याचे पालनपोषण केले.
त्याचे दूध तोडल्यानंतर तिने बालकास लहान असतानाच तिच्याबरोबर घेतले, तसेच तीन वर्षाचा बैल, एक एफा सपीठ आणि द्राक्षारसाचा बुधला घेतला आणि त्याला शिलोह येथे याहवेहच्या मंदिरात आणले.
बैलाचा यज्ञ केल्यानंतर, त्यांनी त्या मुलाला एलीकडे आणले,
आणि हन्ना त्याला म्हणाली, “माझ्या स्वामी, मला क्षमा करा. तुमच्या जीविताची शपथ, मी तीच स्त्री आहे जी येथे तुमच्या बाजूला उभी राहून याहवेहकडे प्रार्थना करीत होती.
या बाळासाठी मी प्रार्थना केली, आणि याहवेहकडे मी जे मागितले त्यांनी ते मला दिले आहे.
तर मी आता त्याला याहवेहला समर्पित करीत आहे. त्याचे संपूर्ण जीवनभर तो याहवेहसाठी दिलेला आहे.” आणि त्याने तिथे याहवेहची उपासना केली.