मुख्य मजकुरावर जा

Hagar बद्दल बायबलमधील वचने

10 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. ही अब्राहामाचा पुत्र इश्माएलची वंशावळ आहे, जो साराहची इजिप्तमधील दासी हागारेपासून जन्मला.

  2. ही इश्माएलाच्या पुत्रांची त्यांच्या जन्मानुसार यादी: इश्माएलाचा प्रथमपुत्र नबायोथ, नंतर केदार, अदबील, मिबसाम,

  3. मिश्मा, दूमाह, मस्सा,

  4. हदद, तेमा, यतूर, नापीश आणि केदमाह.

  5. त्यांनी हगरी, यतूर, नापीश व नोदाब यांच्याशी युद्ध केले.

  6. त्यांच्याशी लढण्यास त्यास साहाय्य मिळून परमेश्वराने हगरी आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या इतर लोकांना त्यांच्या हातात दिले, कारण युध्दसमयी त्यांनी परमेश्वराचा धावा केला; त्यांनी त्यांच्यावर भरवसा ठेवला म्हणून त्यांनी त्यांची प्रार्थना ऐकली.

  7. त्यांनी त्यांची गुरे जप्त केली—पन्नास हजार उंट, दोन लक्ष पन्नास हजार मेंढरे, दोन हजार गाढवे व एक लक्ष पुरुष कैद करून नेले.

  8. बऱ्याच लोकांचा संहार झाला, कारण हे युद्ध परमेश्वराचे होते. ते लोक या प्रदेशात बंदिवासाच्या समयापर्यंत वस्ती करून राहिले.

  9. अलंकारिक रूपात या गोष्टी घेतल्या आहेत पाहा: या स्त्रिया दोन करार आहेत. त्यापैकी एक करार आहे सीनाय पर्वतावर केलेला करार ज्यामुळे दास्यत्वाच्या संतानाचा जन्म होतो: ही हागार आहे.

  10. आता हागार ही अरबस्थानातील सीनाय पर्वत असा आहे आणि आता अस्तित्वात असलेल्या यरुशलेम शहराचे प्रतीक आहे, कारण ती तिच्या संतानाबरोबर दास्यात आहे.