Skip to content

Geology बद्दल बायबलमधील वचने

21 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. नंतर परमेश्वराने म्हटले: “अंतराळाखालील जले एकत्र येवो व कोरडी जमीन दृष्टीस पडो” आणि तसे घडून आले.

  2. परमेश्वराने कोरड्या जमिनीस “भूमी” व जलांच्या संचयास “सागर” अशी नावे दिली. परमेश्वराने पाहिले की, हे चांगले आहे.

  3. अथवा पृथ्वीशी बोलावे आणि ती तुला शिकवेल; किंवा सागरातील माशांनी तुला माहिती देऊ दे.

  4. या सर्वापैकी कोणासही ठाऊक नाही का की याहवेहच्या हाताने हे केले आहे?

  5. गारगोटीसारखा कठीण खडक लोक आपल्या हातांनी फोडतात आणि पर्वतांना समूळ उघडे करतात.

  6. ते खडकामधून भुयारे तयार करतात; आणि त्यांचे डोळे त्यातील मौल्यवान रत्ने पाहतात.

  7. पाण्याच्या प्रवाहांना ते बांध घालतात आणि गुप्त गोष्टी उजेडात आणतात.

  8. दावीदाचे एक स्तोत्र. पृथ्वी व तिच्यातील सर्वकाही याहवेहचे आहे. जग आणि त्यात राहणारे सारे त्यांचेच आहेत.

  9. कारण त्यांनीच तिचा पाया महासागरांवर घातला, आणि त्यांनीच तिला जलप्रवाहांवर स्थिर केले.

  10. तुम्ही पृथ्वीला तिच्या पायावर असे स्थापित केले आहे, जे कधीही ढळणार नाही.

  11. तुम्ही पृथ्वीला गहन जलाशयरूपी वस्त्राने आच्छादिले; जलस्तर पर्वतापेक्षा उंच केले.

  12. परंतु तुम्ही धमकाविताच जलसंचयाने पलायन केले, तुमच्या गर्जनेच्या आवाजाने ते भिऊन पळाले;

  13. ते पाणी पर्वतांवरून वाहिले, दर्‍याखोर्‍यातून गेले, आणि तुम्ही नेमलेल्या पातळ्यांवर ते स्थिर झाले.

  14. तुम्ही त्यांना मर्यादा ठरवून दिली; जेणेकरून त्यांनी पृथ्वी पुन्हा कधीही व्यापून टाकू नये.

  15. त्यांनी खोर्‍यांमधून पाण्याचे वाहते झरे केले; पर्वतामधून त्यांचे प्रवाह वाहत गेले.

  16. ते कुरणातील सर्व प्राण्यांना पाणी पुरवितात; त्या ठिकाणी रानगाढवेही आपली तहान भागवितात.

  17. आकाशातील पक्षी त्या प्रवाहाकाठी घरटी बांधून राहतात; व वृक्षांच्या फांद्यांवरून गाणी गातात.

  18. ते त्यांच्या भवनाच्या वरच्या कक्षातून पर्वतावर पाऊस पाडतात; पृथ्वी त्यांच्या फलवंत कार्याने समाधान पावते.

  19. परंतु ते बुद्धिपुरस्सर हे विसरतात की, फार पूर्वी परमेश्वराच्या शब्दाने आकाशमंडळ अस्तित्वात आले आणि पृथ्वी पाण्यातून व पाण्याद्वारे घडविली गेली.

  20. याच पाण्यामुळे त्यावेळेच्या जगाचा महाप्रलयाने नाश झाला होता.

  21. आता अस्तित्वात असलेले आकाश व पृथ्वी ही त्याच परमेश्वराच्या शब्दाने अग्नीत नष्ट करण्यासाठी राखलेली आहेत, अनीतिमान लोकांच्या न्यायाच्या दिवसासाठी आणि नाशासाठी ती राखून ठेवलेली आहेत.