मुख्य मजकुरावर जा

Friendship बद्दल बायबलमधील वचने

31 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. अत्तर आणि सुगंध मनाला आनंद देतात, आणि अंतःकरणापासून दिलेल्या सल्ल्यातून मित्राचा आनंद उसळून येतो.

  2. तुमचा मित्र किंवा तुमच्या कुटुंबाच्या मित्राला कधीही सोडू नका, आणि संकटसमयी नातेवाईकांच्या घरी जावू नका— दूर राहणाऱ्या नातेवाईकांपेक्षा जवळचा शेजारी बरा.

  3. एकापेक्षा दोघेजण बरे! कारण त्यांच्या कष्टाचे अधिक चांगले प्रतिफळ मिळेल:

  4. दोघांपैकी एकजण पडला, तर दुसरा त्याला मदत करून उठवेल, परंतु एकजण पडला आणि त्याला उचलण्यास कोणी नसला तर ते दयनीय आहे.

  5. जेव्हा दोन व्यक्ती झोपतील तेव्हा ते एकमेकांना ऊब देतील, पण कोणी एकटा असल्यास, त्याला ऊब कशी मिळणार?

  6. एकट्या व्यक्तीवर मात करता येते, दोघे स्वतःचा बचाव करू शकतात, तीन पदरी दोर सहजपणे तुटत नाही.