Skip to content

Conscience बद्दल बायबलमधील वचने

64 वचने · 15 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. किंवा जर मी त्या भोजनामध्ये परमेश्वराचे आभार मानून सहभागी झालो, तर ज्यासाठी मी धन्यवाद दिला त्याबद्दल मला दोष का देण्यात यावा?

  2. तुम्ही जे खाता किंवा पिता किंवा जे काही करता ते सर्व परमेश्वराच्या गौरवासाठीच करावे.

  3. यहूदी असोत की गैरयहूदी असोत किंवा परमेश्वराची मंडळी असो, कोणालाही तुमच्यामुळे अडखळण होऊ नये.

  4. तसे झाले असते, तर एकच अर्पण पुरेसे नव्हते काय? उपासक कायमचे शुद्ध झाले असते तर त्यांची दोषाची भावना नाहीशी झाली असती.

  5. पण त्यांनी त्यांच्या पापांची प्रतिवर्षी त्यांना आठवण करून दिली.

  6. कारण बैलांचे व शेळ्यांचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे.

  7. यास्तव, जेव्हा ख्रिस्त जगात आले तेव्हा ते म्हणाले, “यज्ञ किंवा अर्पणे यांची इच्छा तुम्हाला नाही, परंतु तुम्ही माझ्यासाठी एक शरीर तयार केले;

  8. होमार्पण व पापार्पण यांनी तुम्हाला संतोष झाला नाही.

  9. मग मी म्हणालो, ‘मी येथे आहे; शास्त्रलेखात माझ्याविषयी लिहिले आहे, हे माझ्या परमेश्वरा तुमची इच्छा पूर्ण करण्यास मी आलो आहे.’ ”

  10. ते प्रथम म्हणाले, “बली आणि दाने, होमार्पणे आणि पापार्पणाची तुम्हाला इच्छा नाही व त्यात तुम्हाला संतोष नाही;” जरी ते नियमानुसार अर्पण करत होते.

  11. नंतर ते म्हणाले, “हा मी येथे आहे, तुमच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे.” दुसरी व्यवस्था स्थापन करून त्यांनी पहिली व्यवस्था रद्द केली.

  12. आणि त्या इच्छेद्वारे आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देह बलिदानाद्वारे पवित्र केलेले आहोत.

  13. जर आपली अंतःकरणे आपल्याला दोषी ठरवीत असतील तर हे लक्षात ठेवा की, परमेश्वर आपल्या अंतःकरणापेक्षा महान आहेत आणि ते सर्वकाही जाणतात.

  14. प्रिय मित्रांनो, जर आपली अंतःकरणे आपल्याला दोषी ठरवीत नसतील तर परमेश्वरासमोर येण्यास आपल्याला धैर्य आहे