Skip to content

Beriah बद्दल बायबलमधील वचने

8 वचने · 4 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. आशेरचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: इम्नाहपासून इम्नी कूळ; इश्वीपासून इश्वी कूळ; बरीयाहपासून बरीयाह कूळ;

  2. आणि बरीयाहच्या वंशजांपासून: हेबेरपासून हेबेरी कूळ; मालकीएलपासून मालकीएली कूळ.

  3. एफ्राईमचे वंशज: एफ्राईमचा पुत्र शुथेलह, त्याचा पुत्र बेरेद, त्याचा पुत्र तहथ, त्याचा पुत्र एलिआदाह, त्याचा पुत्र तहथ,

  4. त्याचा पुत्र जाबाद, त्याचा पुत्र शुथेलह. (आणि एजेर व एलद; यास गथच्या मूळ रहिवाशांनी मारून टाकले, कारण त्यांची गुरे जप्त करण्यास ते गेले होते.

  5. यामुळे त्यांचा पिता एफ्राईमने पुष्कळ दिवस शोक केला आणि त्याचे भाऊबंद त्याचे सांत्वन करण्यास आले.

  6. तो आपल्या पत्नीजवळ गेला आणि ती गर्भवती होऊन तिला एक पुत्र झाला. त्याने त्याचे नाव बरीयाह असे ठेवले, कारण त्याच्या घराण्यावर दुर्दैव ओढवले होते.

  7. शिमीचे पुत्र: यहथ, जीजा, यऊश आणि बरीयाह. हे शिमीचे पुत्र; सर्व मिळून चार.

  8. (यहथ हा ज्येष्ठ होता, जीजाह हा दुसरा होता, परंतु यऊश आणि बरीयाह यांना पुष्कळ पुत्र नव्हते; म्हणून ते एकच कुटुंब म्हणून ओळखले जात.)