Beriah बद्दल बायबलमधील वचने: 2. Son of Ephraim
2. Son of Ephraim बद्दल वचने
एफ्राईमचे वंशज: एफ्राईमचा पुत्र शुथेलह, त्याचा पुत्र बेरेद, त्याचा पुत्र तहथ, त्याचा पुत्र एलिआदाह, त्याचा पुत्र तहथ,
त्याचा पुत्र जाबाद, त्याचा पुत्र शुथेलह. (आणि एजेर व एलद; यास गथच्या मूळ रहिवाशांनी मारून टाकले, कारण त्यांची गुरे जप्त करण्यास ते गेले होते.
यामुळे त्यांचा पिता एफ्राईमने पुष्कळ दिवस शोक केला आणि त्याचे भाऊबंद त्याचे सांत्वन करण्यास आले.
तो आपल्या पत्नीजवळ गेला आणि ती गर्भवती होऊन तिला एक पुत्र झाला. त्याने त्याचे नाव बरीयाह असे ठेवले, कारण त्याच्या घराण्यावर दुर्दैव ओढवले होते.