Avarice बद्दल बायबलमधील वचने: Instances of, the descendants of Joseph
Instances of, the descendants of Joseph बद्दल वचने
योसेफाचे लोक यहोशुआला म्हणाले, “वतन म्हणून तू आम्हाला एकच वाटा आणि एकच भाग का दिला आहेस? आम्ही संख्येने पुष्कळ लोक आहोत आणि याहवेहने आम्हाला पुष्कळ आशीर्वादित केले आहे.”
तेव्हा यहोशुआने उत्तर दिले, “जर तुम्ही संख्येने पुष्कळ आहात आणि एफ्राईमचा डोंगराळ प्रदेश तुमच्यासाठी खूप लहान आहे, तर परिज्जी व रेफाईम लोक राहतात तो रानाचा प्रदेश तुमच्यासाठी मोकळा करून घ्या.”
योसेफाच्या लोकांनी म्हटले, “डोंगराळ प्रदेश आम्हाला पुरेसा नाही आणि बेथ-शान व सभोवतालच्या वस्तीत राहणारे व येज्रील खोर्यात राहणार्या कनानी लोकांजवळ लोखंडी रथ आहेत.”
परंतु यहोशुआ योसेफाच्या गोत्राचे एफ्राईम आणि मनश्शेहला म्हणाला; “तुम्ही संख्येने पुष्कळ आणि बलवान आहात. तुम्हाला केवळ एकच भाग नसावा
परंतु अरण्यातील डोंगराळ भाग व त्याच्या टोकापर्यंतच्या हद्दी तुमच्या होतील; जरी कनानी लोकांजवळ लोखंडी रथ आहेत आणि ते फार शक्तिशाली आहेत, तरीही तुम्ही त्यांना घालवून देऊ शकाल.”