Avarice बद्दल बायबलमधील वचने: General references
General references बद्दल वचने
पुन्हा एकदा या सूर्याखाली निरर्थक असे काहीतरी मी पाहिले:
एक एकटाच मनुष्य होता; त्याला ना मुलगा होता ना भाऊ. त्याच्या श्रमाला अंत नव्हता, तरी त्याच्या डोळ्यात धनाने तृप्तता नव्हती. तो विचारीत होता, “मी कोणासाठी हे श्रम करीत आहे,” “आणि मी स्वतःला आनंदापासून का वंचित ठेवीत आहे?” हे सुद्धा व्यर्थ आहे— ही दैन्यावस्था आहे.
पैशावर प्रेम असणार्याला पैसा कधीच पुरेसा नसतो; जो कोणी संपत्तीवर प्रेम करतो, तो कधीही आपल्या मिळकती मध्ये समाधानी नसतो, हे सुद्धा व्यर्थच आहे.
संपत्ती वाढली म्हणजे, तिचा उपभोग घेणारे सुद्धा वाढतात. आणि ती केवळ आपल्या दृष्टीने बघून आनंदित होण्या व्यतिरिक्त त्या मालकाला काय लाभ?
तर अध्यक्ष निर्दोष, एका पत्नीचा पती असावा, सौम्य, सावधान, आदरणीय, अतिथिप्रिय आणि शिकविण्यात निपुण असावा.
तो मद्यपी अथवा भांडखोर नसावा, तर तो सौम्य व दयाळू असावा, तो पैशावर प्रीती करणारा नसावा.