Amorites बद्दल बायबलमधील वचने: Judgments denounced against
Judgments denounced against बद्दल वचने
तेव्हा याहवेहने उत्तर दिले: “मी तुझ्याशी एक करार करीत आहे. तुझ्या लोकांसमोर मी असे चमत्कार करेन की जे संपूर्ण पृथ्वीवर कोणत्याही राष्ट्रात करण्यात आले नाहीत. ज्या लोकांमध्ये तू राहतो ते पाहतील की मी, याहवेहने तुझ्यासाठी केलेली कृत्ये किती भयावह आहेत.
मी तुला आज जे आज्ञापितो ते तू पाळावे. मी तुमच्यापुढून अमोरी, कनानी, हिथी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी यांना घालवून देईन.
हिथी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी—यांचा समूळ नायनाट करावा—ही आज्ञा याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला दिली आहे.
नाहीतर ते त्यांच्या दैवतांची उपासना करताना ज्या किळसवाण्या चालीरीती करतात त्या तुम्हाला शिकवतील व तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराविरुद्ध पाप कराल.