Abiezer बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
हे गिलआदाचे वंशज होते: इएजेरपासून इएजेरी कूळ; हेलेकपासून हेलेकी कूळ;
हा वाटा मनश्शेहच्या बाकीच्या लोकांसाठी; अबिएजेर, हेलेक अस्रिएल, शेखेम, हेफेर व शेमीदा यांच्या कुळांसाठी होता. योसेफाचा पुत्र मनश्शेहच्या कुळातील हे इतर पुरुष वंशज आहेत.
तेव्हा याहवेहचा आत्मा गिदोनावर आला आणि त्याने रणशिंग फुंकले; अबिएजेरी लोक त्याच्याकडे आले.
परंतु त्याने त्यांना उत्तर दिले, “तुमच्या तुलनेत मी काय साध्य केले आहे? एफ्राईमच्या द्राक्षांचा सरवा हा अबिएजेराच्या द्राक्षाच्या पूर्ण कापणीपेक्षा चांगला नाही काय?
अनाथोथचा अबिएजेर, हुशाथचा सिब्बखय,
नवव्या महिन्याचा नववा सेनापती बिन्यामीन अनाथोथी अबिएजेर होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते.