मुख्य मजकुरावर जा

Bethel

62 verses · 3 known names

हे नावानेही ओळखले जाते: Beth-el, house

31.9300, 35.2200 गूगल नकाशावर पाहा

Bethel चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. बेथेल व आयचे 123,

  2. बिन्यामीन वंशातील लोक खालील ठिकाणी राहत होते: गेबा, मिकमाश, अय्याह, बेथेल, आणि त्यांच्या सभोवतालची गावे,

  3. इस्राएलने बेथेल येथे भरवसा ठेवला, व मग त्यांना जशी आपल्या वासराच्या मूर्तीची लाज वाटली. तशीच मोआबाला आपल्या कमोशाची लाज वाटेल,

  4. तसेच बेथेल तुझ्यासोबत होईल, कारण तुझी दुष्टता फार अधिक आहे. तेव्हा त्या दिवशी सकाळच्या प्रहरी इस्राएलाच्या राजाचा पूर्णरीतीने नाश केला जाईल.

  5. तो स्वर्गदूताशी झगडला आणि त्याच्यावर विजयी झाला; तो रडला आणि त्याची मेहेरबानी व्हावी म्हणून त्याने भीक मागितली. बेथेलला ते त्याला भेटले आणि तिथे तो त्यांच्याशी बोलला—

  6. “ज्या दिवशी मी इस्राएलला तिच्या पातकाबद्दल शिक्षा करेन, त्याच दिवशी मी बेथेलमधल्या वेद्यांचा नाश करेन; वेद्यांची शिंगे कापून टाकण्यात येतील आणि ती जमिनीवर पडतील.

  7. “बेथेलास जा आणि पाप करा; गिलगालास जाऊन आणि अधिक पाप करा. रोज सकाळी आपली अर्पणे, दर तीन वर्षांनी आपला दशांश आणा.

  8. बेथेलचा शोध करू नका, गिलगाल येथे जाऊ नका, किंवा बेअर-शेबा येथे प्रवास करू नका. कारण गिलगाल खचितच बंदिवासात जाईल, आणि बेथेलचा पूर्ण नाश होईल”

  9. याहवेहचा शोध करा म्हणजे तुम्ही वाचाल, नाहीतर याहवेह योसेफाच्या गोत्रावर अग्नीसारखे भडकतील; आणि त्याला भस्म करून टाकील, आणि बेथेलमध्ये त्याला विझवणारा कोणीही नसेल.

  10. तेव्हा बेथेलचा याजक, अमस्याहने इस्राएलचा राजा यरोबोअमाला हा निरोप पाठविला: आमोस इस्राएलच्या हृदयात तुमच्याविरुद्ध कट रचीत आहे. त्याचेही सर्व शब्द देशासाठी असह्य आहेत.

  11. याच्यापुढे बेथेल येथे संदेश देऊ नकोस, कारण हे राजकीय भवन आहे आणि राज्याचे मंदिर आहे.”

  12. बेथेल शहरात राहणार्‍या यहूदी लोकांनी राजाचा प्रमुख शासकीय अधिकारी शरेसर आणि रगेम-मेलेकच्या नेतृत्वाखाली लोकांचे एक पथक यरुशलेमच्या मंदिरात याहवेहचा आशीर्वाद मागण्यासाठी,