Skip to content
प्रकटीकरण २२:६-११

प्रकटीकरण २२:६-११

नंतर तो देवदूत मला म्हणाला, “ही वचने सत्य व विश्वसनीय आहेत आणि संदेष्ट्यांना अंतःस्फूर्ती देणाऱ्या प्रभू परमेश्वरांनी ज्यागोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत, त्या त्यांच्या सेवकांना कळविण्यासाठी त्यांच्या दूताला पाठविले आहे.”
“पाहा, मी लवकर येतो! जो कोणी या पुस्तकात लिहिलेली भविष्यवचनाचे पालन करतो तो धन्य.”
मी, योहानाने या सर्वगोष्टी ऐकल्या व पाहिल्या आणि ज्या देवदूताने मला त्या दाखविल्या, त्याला नमन करण्यासाठी मी त्याच्या पायांवर उपडा पडलो.
परंतु तो मला म्हणाला, “असे करू नकोस. संदेष्टे व या पुस्तकातील वचने पाळणारे लोक यांच्या सोबतीचा मी सेवकबंधू आहे. तू परमेश्वराची आराधना कर.”
१०
नंतर त्याने मला सांगितले, “या पुस्तकातील भविष्यकथनाचे शब्द शिक्का मारून बंद करू नकोस, कारण वेळ जवळ आली आहे.
११
अनाचारी अधिक अनाचार करोत, दुष्ट अधिक दुष्ट बनोत, न्यायी लोक अधिक नीतिमान होवोत व जे पवित्र आहेत, ते पवित्रतेत अधिकाधिक दृढ होवोत.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options