Skip to content
स्तोत्रसंहिता ७८:४०-५१

महामारी व सुटकेचे विस्मरण

स्तोत्रसंहिता ७८:४०-५१
४०
त्यांनी कितीदा तरी त्यांच्याविरुद्ध बंड केले आणि अरण्यात त्यांना दुःख दिले!
४१
पुन्हा आणि पुन्हा त्यांनी परमेश्वराची परीक्षा पाहिली; इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराला त्यांनी चिथविले.
४२
पीडा देणार्‍यापासून त्यांनी केलेली त्यांची सुटका— त्यांच्या सामर्थ्याचे त्यांनी स्मरण केले नाही,
४३
ज्या दिवशी त्यांनी इजिप्तमध्ये आपली चिन्हे प्रदर्शित केली, सोअनाच्या प्रदेशात त्यांनी चमत्कार केले.
४४
त्यांनी त्यांच्या नद्यांच्या पाण्याचे रूपांतर रक्तात केले; त्यामुळे त्यांच्या जलप्रवाहातील पाणी पिता आले नाही.
४५
सर्व इजिप्त देश खाऊन टाकण्यासाठी त्यांनी कीटकांचे थवेच्या थवे पाठविले आणि बेडकांनी सर्व विध्वंस करून टाकले.
४६
त्यांनी त्यांची पिके सुरवंटांना खावयास दिली; त्यांचा हंगाम टोळांनी फस्त केला.
४७
त्यांनी गारांनी त्यांच्या द्राक्षवेलींचा आणि उंबराच्या झाडांचा बर्फाने नाश केला.
४८
त्यांनी त्यांची गुरे गारांनी नष्ट केली, विजेने त्यांची मेंढरे ठार झाली.
४९
त्यांनी त्यांच्यावर आपला तीव्र राग, क्रोध, संताप आणि शत्रुत्व— आणि नाश करणारा देवदूतांचा एक गट सोडला.
५०
त्यांनी आपल्या क्रोधास मोकळी वाट करून दिली; त्यांनी त्यांचे जीव मृत्यूपासून वाचविले नाहीत, तर त्यांना पीडेच्या हवाली केले.
५१
इजिप्त देशाच्या प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ पुत्रांस त्यांनी ठार केले; जे हामाच्या डेर्‍यातील पौरुषाचे प्रथमफळ होते.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options