Skip to content
स्तोत्रसंहिता ७८:५२-५५

स्तोत्रसंहिता ७८:५२-५५

५२
पण त्यांनी आपल्या लोकांस मेंढरांसारखे बाहेर आणून, त्यांना वाट दाखवित मेंढरांसारखे रानातून नेले,
५३
त्यांनीच त्यांचे सुरक्षित मार्गदर्शन केले, म्हणून ते भयभीत झाले नाहीत; परंतु त्यांच्या शत्रूंना मात्र समुद्रात बुडवून टाकले.
५४
त्यांनी आपल्या उजव्या हाताने त्यांना आपल्या पवित्र भूमीच्या सीमेवरील पर्वतीय देशात आणले.
५५
त्यांनी राष्ट्रांना त्यांच्या समोरून काढून टाकले आणि त्यांची जमीन त्यांना सूत्राने मापून वतन म्हणून दिली; त्यांनी इस्राएलाच्या गोत्रास त्यांच्या घरात स्थायिक केले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options