Skip to content
स्तोत्रसंहिता ७२:४-१४

स्तोत्रसंहिता ७२:४-१४

तो लोकांमधील पीडितांचा बचाव करो आणि गरजूंच्या मुलांना वाचवो; तो जुलमीला चिरडून टाको.
जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आकाशात राहतील, तोपर्यंत पिढ्यान् पिढ्या तुमचे भय बाळगून तुमचा आदर करोत.
कापलेल्या गवतावर पडणार्‍या पावसाप्रमाणे, पृथ्वीला पाणी देणार्‍या सरीप्रमाणे तो होवो.
त्याच्या कारकिर्दीत सर्व नीतिमानांची भरभराट होवो आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत समृद्धी वाढो.
त्याची सत्ता एका समुद्रापासून दुसऱ्या समुद्रापर्यंत आणि नदीपासून पृथ्वीच्या दिगंतापर्यंत राहो.
अरण्यातील लोक त्याच्यासमोर नतमस्तक होवोत आणि त्याचे शत्रू धूळ चाटोत.
१०
तार्शीश आणि तटवर्तीय राजे आपआपले नजराणे आणोत, शबा व सबा यांचे सर्व राजे आपले उपहार आणोत.
११
होय, सर्व ठिकाणचे राजे त्याला नमन करोत; सर्व राष्ट्रे त्याची सेवा करोत.
१२
ज्यांचा कोणी सहायक नाही अशा धावा करणार्‍या दुःखितांना तो मुक्त करेल.
१३
दुर्बल आणि दरिद्री यांची त्याला दया येवो; तो गरजवंताला मृत्यूपासून वाचवेल.
१४
तो त्यांना छळ आणि हिंसा यांच्यापासून वाचवेल, कारण त्यांचे जीवित रक्त मोलाचे आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options