Skip to content
स्तोत्रसंहिता ७१:१९-२४

स्तोत्रसंहिता ७१:१९-२४

१९
परमेश्वरा, तुमचे नीतिमत्व आकाशापर्यंत अत्यंत उंच आहे; तुम्ही केलेली कृत्ये अद्भुत आहेत, परमेश्वरा, तुमच्यासारखा दुसरा कोण आहे?
२०
असाध्य, असंख्य आणि अतितीव्र समस्या तुम्ही मला दाखविल्या आहेत, तरी तुम्ही मला नवजीवन द्याल, आणि पृथ्वीच्या गर्भातून तुम्ही मला पुन्हा वर काढाल.
२१
तुम्ही माझा सन्मान वाढवाल आणि माझ्याकडे वळून पुनः माझे सांत्वन कराल.
२२
माझ्या परमेश्वरा, मी सतारीवर तुमच्या विश्वासूपणाबद्दल तुमचे स्तवन करेन; हे इस्राएलाच्या पवित्र परमेश्वरा, मी वीणेवर तुमची स्तुती गाईन.
२३
हर्षभराने माझे ओठ तुमचा जयजयकार करतील आणि तुम्ही माझा उद्धार केला म्हणून मी तुमची स्तुतिस्तोत्रे उच्चस्वराने गाईन.
२४
तुमच्या न्यायीपणाचे वर्णन माझी जीभ दिवसभर करेल, कारण मला अपाय करण्याची योजना करणारे सर्व लज्जित आणि अपमानित झाले आहेत.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options