Skip to content
स्तोत्रसंहिता ७२:१५-१७

समृद्धी व सनातन कीर्ती

स्तोत्रसंहिता ७२:१५-१७
१५
तो चिरायू होवो! त्याला शबाचे सोने मिळो; त्याचे लोक सतत त्याच्यासाठी प्रार्थना करोत आणि दिवसभर त्याला आशीर्वाद देवोत.
१६
देशभर विपुल धान्य उगवो; लबानोनच्या शिखरावर ते डोलू द्या, देशातील डोंगरही धान्याने आच्छादून जावोत; शेतातील भरगच्च गवताप्रमाणे शहरे लोकांनी भरून गजबजून जावोत.
१७
त्याचे नाव सर्वकाळ राहो, जोपर्यंत सूर्य आहे, त्याचे नाव वाढत जावो. सर्व राष्ट्रे त्याच्याद्वारे आशीर्वादित होवोत, आणि ते त्याला धन्य म्हणोत.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options