Skip to content
स्तोत्रसंहिता ३७:३४-४०

स्तोत्रसंहिता ३७:३४-४०

३४
याहवेहची प्रतीक्षा कर आणि त्यांच्या सन्मार्गाचे अवलंबन कर. तेच तुला उंच करून पृथ्वीचे अधिकारी करतील; दुष्ट लोक नष्ट झाल्याचे तू डोळ्यांनी पाहशील.
३५
मी एक वाईट व क्रूर मनुष्य पाहिला आहे. तो सुपीक जमिनीतील हिरव्यागार झाडासारखा पसरलेला होता.
३६
परंतु तो लवकरच नाहीसा झाला; मी त्याचा शोध घेतला, पण तो मला सापडला नाही.
३७
सात्विक मनुष्याकडे लक्ष लाव, सरळ मनुष्याकडे पाहा; शांतताप्रिय मनुष्याचा भावी काळ सुखाचा आहे.
३८
परंतु सर्व पापी लोक नष्ट केले जातील; आणि त्याची संतती छाटली जाईल.
३९
याहवेहद्वारे नीतिमानांचे तारण होते. संकटकाळी ते त्यांचे आश्रयदुर्ग असतात.
४०
याहवेह त्यांचे साहाय्य करतात आणि त्यांना मुक्त करतात; दुष्टांपासून सुटका करून त्यांचे रक्षण करतात, कारण त्यांनी याहवेहचा आश्रय घेतला आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options