Skip to content
स्तोत्रसंहिता ३८:१-८

पाप व आजाराचे ओझे

स्तोत्रसंहिता ३८:१-८
दावीदाचे स्तोत्र. एक याचिका. याहवेह, तुम्ही क्रोधाने मला शासन करू नका. संतापून मला दंड करू नका.
तुमचे बाण माझ्या शरीरात खोल रुतले आहेत; तुमचे हात माझ्यावर जड झाले आहेत.
तुमच्या संतापामुळे माझे शरीर रोगजर्जर झाले आहे; माझ्या पातकांमुळे माझ्या हाडांमध्ये स्वस्थता नाही.
माझे दोष इतके भारी आहेत की ते वाहून नेणे अशक्य आहे.
माझ्या पापाच्या मूर्खपणामुळे, माझ्या जखमा सडून त्यास दुर्गंधी सुटली आहे.
मी वाकून गेलो आणि वेदनेने त्रस्त झालो आहे; मी दिवसभर शोक करीत असतो.
माझ्या पाठीचा दाह होत आहे; माझ्या अंगी अजिबात आरोग्य राहिलेले नाही.
मी पार गळून व चिरडून गेलो आहे; माझ्या हृदयाच्या वेदनेने मी कण्हत आहे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options