Skip to content
स्तोत्रसंहिता ३७:२१-३३

स्तोत्रसंहिता ३७:२१-३३

२१
दुष्ट लोक उसने घेतात पण फेडीत नाहीत, परंतु नीतिमान उदारपणे देत असतो;
२२
याहवेह ज्यांना आशीर्वाद देतात, ते पृथ्वीचे वतन पावतील, परंतु जे शापित आहेत, ते नष्ट होतील.
२३
ज्याला याहवेह प्रिय वाटतात, त्या मनुष्याची पावले याहवेह स्थिर करतात;
२४
जरी तो अडखळला, तरी तो खाली पडणार नाही, कारण याहवेह त्याला आपल्या हाताने सावरतील.
२५
मी तरुण होतो आणि आता प्रौढ झालो आहे, तरी आजपर्यंत नीतिमानाला टाकलेला किंवा त्याच्या संततीला भीक मागताना मी पाहिले नाही.
२६
ते नेहमी इतरांना उदारतेने दान आणि उसने देतात; त्यांची संतती आशीर्वाद असते.
२७
वाईटापासून दूर राहा आणि चांगले ते करा; म्हणजे तुम्ही या देशात कायमचे राहाल.
२८
कारण याहवेहस न्यायी प्रिय आहे; ते आपल्या विश्वासू भक्तांचा कधीही त्याग करणार नाही. दुष्टपणा करणारे लोक मात्र पूर्णपणे नाश पावतील, दुष्टांची संतती नष्ट होऊन जाईल.
२९
नीतिमानास पृथ्वीचे वतन मिळेल आणि आपल्या वतनात ते सर्वदा राहतील.
३०
नीतिमान आपल्या मुखाने ज्ञानाच्या गोष्टी बोलतो, त्याची जीभ जे न्याय्य आहे ते उच्चारते.
३१
परमेश्वराचे नियम त्याच्या अंतःकरणात असतात; त्याची पावले घसरणार नाही.
३२
दुष्ट लोक नीतिमानांवर टपलेले असतात, त्यांना जिवे मारण्याची वाट पाहत असतात.
३३
परंतु याहवेह त्यांना दुष्ट लोकांच्या हाती देणार नाही, किंवा न्यायालयात त्यांना ते दोषीही ठरविले जाऊ देणार नाही.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options