स्तोत्रसंहिता ३७:१२-२०
१२
दुष्ट लोक नीतिमानाविरुद्ध कट रचतात, त्यांना पाहून आपले दातओठ खातात;
१३
प्रभू दुष्टांवर हसत आहे, कारण त्यांना माहीत आहे की त्यांचा दिवस येत आहे.
१४
दीनदुबळ्यांस ठार करावे व सरळ मार्गाने चालणार्यांचा वध करण्यास दुष्ट तलवार उपसतात आणि धनुष्य वाकवून सज्ज करतात.
१५
परंतु त्यांच्या तलवारी त्यांच्याच हृदयास छेदणार, आणि त्यांची धनुष्ये तोडून टाकली जाणार.
१६
दुर्जनांनी दुष्टाईने मिळविलेल्या विपुल धनापेक्षा नीतिमानाचे सीमित धन बरे;
१७
दुष्टांचे सामर्थ्य मोडून टाकले जाईल, परंतु याहवेह नीतिमानांना आधार देतात.
१८
निर्दोष लोकांच्या दिवसांवर याहवेहचे लक्ष असते, आणि त्यांचे वतन सर्वकाळ टिकते.
१९
कठीण काळी ते लज्जित होणार नाही; दुष्काळात त्यांच्याजवळ भरपूर असेल.
२०
पण दुष्ट लोक मात्र नष्ट होतील: याहवेहचे शत्रू हे मैदानातील फुलांप्रमाणे वाळून जातील आणि धुराप्रमाणे दिसेनासे होतील.
Settings