Skip to content
स्तोत्रसंहिता ३७:७-११

स्तोत्रसंहिता ३७:७-११

याहवेहसमोर निश्चिंत राहा व धीराने त्यांची वाट पाहा; जेव्हा लोकांना त्यांच्या मार्गात यश मिळते, त्यांच्या दुष्ट योजना सफल होतात, तेव्हा तू संतापू नकोस.
तुझा राग सोडून दे आणि चिरडीस येऊ नको; हेवा करू नको—नाहीतर वाईट करण्यास तू प्रवृत्त होशील.
दुष्टांचा नाश ठरलेलाच आहे. परंतु ज्यांची आशा याहवेहवर आहे, त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल.
१०
थोडक्याच अवधीत दुष्ट लोक नाहीसे होतील; त्यांना शोधूनही ते तुला सापडणार नाहीत.
११
परंतु नम्र लोकांना पृथ्वीचे वतन मिळेल आणि ते विपुल शांती व समृद्धीचा उपभोग घेतील.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options