मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता ३५:१९-२८

न्याय व समर्थनासाठी अंतिम विनंती

स्तोत्रसंहिता ३५:१९-२८
१९
जे विनाकारण माझे शत्रू बनले आहेत, त्यांना आता माझा उपहास करण्यात आनंद करू देऊ नका; निष्कारण जे माझे विरोधी झाले आहेत त्यांना डोळे मिचकाविण्याची संधी देऊ नका.
२०
ते शांतता प्रस्थापित करण्यासंबंधी चर्चा न करता, शांतीने राहणार्‍या निरपराध लोकांविरुद्ध कट करण्यासंबंधी चर्चा करीत असतात.
२१
ते आपले तोंड उघडून माझ्याविरुद्ध ओरडून सांगतात, “अहाहा! अहाहा! आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिले आहे.”
२२
याहवेह, सत्य तुमच्या दृष्टीत आहे; तुम्ही शांत राहू नका; हे प्रभू, आता माझ्यापासून दूर राहू नका.
२३
हे माझ्या परमेश्वरा, माझ्या प्रभू, माझ्या सुरक्षेसाठी उठा, माझ्याकरिता युद्ध करा.
२४
याहवेह माझ्या परमेश्वरा आपल्या नीतिमत्तेने मला निर्दोष जाहीर करा; त्यांनी मजविरुद्ध आनंद करू नये.
२५
त्यांनी असे मनात बोलू नये, “हा हा हा! आम्हाला असेच हवे होते; आम्ही त्याला गिळून टाकले.” असे त्यांना बोलू देऊ नका.
२६
माझी संकटे पाहून आनंद करणार्‍यांना लज्जित आणि निराश करा; जे माझ्यापुढे प्रौढी मिरवितात, त्यांना लज्जित आणि अपमानित करा.
२७
परंतु माझे कल्याण व्हावे असे इच्छा करणार्‍या सर्वांना मोठा आनंद प्राप्त होऊ द्या; त्यांना आनंदाने ओरडू द्या, “आपल्या सेवकाला आनंदाने साहाय्य करणारे याहवेह किती थोर आहेत.”
२८
माझी जीभ तुमच्या नीतिमत्वाची घोषणा करणार आणि दिवसभर तुमची उपासना करीत राहणार.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options