मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता ३१:१९-२४

देवाच्या महान चांगुलपणाचे गौरवगान

स्तोत्रसंहिता ३१:१९-२४
१९
तुमचा चांगुलपणा किती विपुल आहे, जो तुम्ही तुमच्या भय धरणार्‍यांसाठी राखून ठेवला आहे, आणि जे लोक तुमच्या ठायी आश्रय घेतात त्यांच्यावर त्याचा सर्वांसमक्ष वर्षाव करता.
२०
आपल्या उपस्थितीच्या आश्रयस्थानी तुम्ही मनुष्यांच्या युक्तीपासून त्यांचे रक्षण करता; आपल्या मंडपात तुम्ही त्यांना शत्रूंच्या आरोप करणार्‍या जिभेपासून बचाव करता.
२१
याहवेह धन्यवादित असोत, कारण ज्यावेळी मी शत्रूंनी वेढलेल्या शहरात होतो, त्यांनी मला प्रेमदयेने अद्भुत कृत्ये दाखविली आहेत.
२२
माझ्या उतावळेपणात मी म्हटले, “मला तुमच्या दृष्टीपुढून काढून टाकले आहे!” तरीही जेव्हा मी साहाय्यासाठी तुम्हाला हाक मारली तेव्हा माझी दयेची विनवणी तुम्ही ऐकली.
२३
अहो याहवेहच्या सर्व भक्तांनो, त्यांच्यावर प्रीती करा! याहवेह प्रामाणिक लोकांना मदत करतात पण ते गर्विष्ठांना पूर्ण मापाने शिक्षा करतात.
२४
याहवेहवर भरवसा ठेवणारे सर्वजण, खंबीर व्हा आणि धैर्याने राहा.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options