Skip to content
स्तोत्रसंहिता ३१:१४-१८

स्तोत्रसंहिता ३१:१४-१८

१४
परंतु याहवेह, माझा भरवसा तुमच्यावर आहे. मी म्हणालो, “तुम्हीच माझे परमेश्वर आहात.”
१५
माझे दिवस तुमच्याच हातात आहेत. माझ्या शत्रूंच्या हातातून, माझा पाठलाग करणार्‍यांपासून तुम्हीच मला सोडवा.
१६
तुमचा मुखप्रकाश तुमच्या दासावर पडू द्या; तुमच्या प्रेमदयेने माझे तारण करा.
१७
याहवेह, मला लज्जित होऊ देऊ नका, मी तुमचा धावा केला आहे; दुष्ट लोक लज्जित होवोत; ते अधोलोकात निःशब्द होवोत.
१८
त्यांचे असत्य बोलणारे ओठ शांत केले जावो. कारण ते अहंकाराने आणि तिरस्काराने प्रेरित होऊन नीतिमानाविरुद्ध गर्वाने बोलतात.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options