मुख्य मजकुरावर जा
नीतिसूत्रे ३०:१-६

आगूराची वचने: शीर्षक

नीतिसूत्रे ३०:१-६
मस्सा याकेहाचा पुत्र आगूराची आत्मप्रेरित वचने. या मनुष्याने इथिएल व उकाल यांना उद्देशून असे बोलले आहे: “परमेश्वरा, मी थकलो आहे, तरीही मी जिंकू शकतो.
मी फक्त पशुतुल्य आहे, मनुष्य नाही; मला मानवी समज नाही.
मी सुज्ञता शिकलो नाही, तसेच मला पवित्र परमेश्वराचे ज्ञानही नाही.
वर स्वर्गात कोण चढून गेला आणि मग खाली उतरला आहे? वार्‍याला मुठीमध्ये धरलेला असा कोण आहे? अंगरख्यामध्ये कोणी पाणी बांधले आहे काय? पृथ्वीच्या सर्व सीमांची स्थापना कोणी केली आहे? त्याचे नाव काय आहे आणि त्याच्या पुत्राचे नाव काय आहे? तुम्हाला ते निश्चितच माहीत आहे!
“परमेश्वराचा प्रत्येक शब्द दोषरहित आहे; जे त्यांच्याकडे आश्रय घेतात, त्यांची ते ढाल आहेत.
त्यांच्या वचनात भर घालू नका. नाहीतर ते तुम्हाला रागावतील आणि तुम्ही लबाड आहात हे सिद्ध होईल.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options