Skip to content
नीतिसूत्रे २६:१७-२२

कलह व चुगली टाळणे

नीतिसूत्रे २६:१७-२२
१७
आपला संबंध नसलेल्यांच्या भांडणामध्ये पडणारे एखाद्या भटक्या कुत्र्याचे कान ओढणार्‍यासारखे असतात.
१८
जसा एखादा माथेफिरू मृत्यूचे जळते बाण फेकतो,
१९
तो अशा मनुष्यासारखा आहे, जो त्याच्या शेजार्‍यांना फसवितो आणि म्हणतो, “मी तर गंमत करीत होतो!”
२०
लाकूड नसले तर आग विझते; आणि चहाड्या नसल्या की भांडण नाहीसे होते.
२१
जसे कोळसे निखारे आणि लाकूड अग्नी प्रज्वलित करते, तशाच प्रकारे भांडखोर मनुष्य कलह उत्पन्न करतो.
२२
अफवा स्वादिष्ट भोजनासारख्या चवदार असतात; अंतःकरणात त्या खोलवर रुजून जातात.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options