मुख्य मजकुरावर जा
नीतिसूत्रे २३:२४-२८

नीतिसूत्रे २३:२४-२८

२४
नीतिमान मुलाच्या वडिलांना फार आनंद होतो; जो मनुष्य सुज्ञ पुत्राचा पिता आहे त्यामध्ये तो उल्लसित असतो.
२५
तुझे वडील आणि आई आनंदी असावेत; आणि जिने तुला जन्म दिला ती हर्षित असो!
२६
माझ्या मुला, तुझे अंतःकरण मला दे आणि तुझी दृष्टी माझ्या मार्गामध्ये प्रसन्न असावी,
२७
कारण व्यभिचारी स्त्री एक खोल खड्डा आहे, आणि परस्त्री म्हणजे एक अरुंद विहीर आहे.
२८
एखाद्या लुटारूप्रमाणे ती दबा धरून बसते आणि लोकांमध्ये विश्वासघातक्यांची संख्या वाढवते.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options