- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
देवाचे सार्वभौमत्व व खरे नीतिमत्त्व
नीतिसूत्रे २१:१-८
१
याहवेहच्या नियंत्रणात असलेले राजाचे हृदय पाण्याचा प्रवाह आहे, जे त्यांना संतोष देतात त्यांच्याकडे ते वळवितात.
२
माणसांना वाटते की त्यांचेच मार्ग योग्य आहेत, परंतु याहवेह अंतःकरण तोलून पाहतात.
३
अर्पणापेक्षा मनुष्याच्या न्याय्य व रास्त वागण्याने याहवेहला अधिक संतोष होतो.
४
गर्विष्ठ दृष्टी आणि अभिमानी अंतःकरण— दुष्टांचे नांगर न चालविलेले शेत—पाप उत्पन्न करतात.
५
कष्ट करणार्यांच्या योजना भरभराटीस येतात, पण उतावळेपणा दारिद्र्यास कारणीभूत होईल.
६
लबाड बोलून मिळवलेली संपत्ती, म्हणजे उडून जाणारी वाफ आणि प्राणघातक सापळा आहे.
७
दुष्टांचा हिंसाचार त्यांना ओढून घेऊन जाईल, कारण चांगले करण्यास ते नकार देतात.
८
दोषी मनुष्याचा मार्ग फसविणारा आहे, परंतु निर्दोष मनुष्याचे वागणे सरळपणाचे असते.
Settings