Skip to content
नीतिसूत्रे २०:२६-३०

राजा, देवाचे नियंत्रण व शिस्त

नीतिसूत्रे २०:२६-३०
२६
सुज्ञ राजा दुष्टांना पाखडून बाहेर काढतो; तो मळणीचे चक्र त्यांच्यावर फिरवितो.
२७
मनुष्याचा आत्मा याहवेहचा दीप आहे. तो मनुष्याच्या अंतःकरणावर प्रकाश टाकतो.
२८
प्रीती आणि विश्वासूपणा राजाला सुरक्षित ठेवते; तर प्रीतीद्वारे त्याचे सिंहासन सुरक्षित केले जाते.
२९
तरुणांचे भूषण त्यांचे बळ आहे. वृद्धांचे भूषण त्यांचे पांढरे केस आहेत.
३०
बसलेला मार आणि जखमा दुष्टता धुवून टाकते, आणि बसलेल्या फटक्यांनी अंतःकरण शुद्ध होते.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options