Skip to content
गणना २९:७-११

प्रायश्चित्ताच्या दिवसाची अर्पणे

गणना २९:७-११

प्रायश्चित्ताच्या दिवसाची अर्पणे

“ ‘याच सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी एक पवित्र सभा भरवा. तुम्ही स्वसुखाचा त्याग करावा व कोणतेही नियमित काम करू नये.
याहवेहला सुवास म्हणून एक तरुण गोर्‍हा, एक मेंढा आणि एक वर्षाची सात कोकरे यांचे होमार्पण सादर करा, ते सर्व निर्दोष असावेत;
गोर्‍ह्याकरिता तेलात मळलेले एका एफाचे तीन दशांश बारीक पीठ; आणि मेंढ्याकरिता दोन दशांश असे धान्यार्पण करावे;
१०
आणि सात कोकर्‍यातील प्रत्येकी एक दशांश बारीक पीठ अर्पावे.
११
प्रायश्चित्ताचे पापार्पण, नियमित होमार्पण व त्याचे धान्यार्पण व त्याचे पेयार्पण, याबरोबरच पापार्पणासाठी एक बोकड अर्पण करावा.

उताऱ्याचा अभ्यास

एका वचनावर नसून संपूर्ण उताऱ्यावर आधारित भाष्य.

शास्त्रात हे आणखी कोठे सांगितले आहे.

  • लेवीय १६:२९

    तुम्ही जो नियम सर्वकाळ पाळला पाहिजे तो हा: सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी तुम्ही स्वतःला नाकारले पाहिजे आणि—तुमच्यामध्ये जन्मलेले स्वदेशी किंवा तुमच्यामध्ये राहणारे परदेशी—कोणतेही कार्य करू नये
    वचन ७ मधून
  • लेवीय १६:३१

    तुमच्यासाठी हा विसाव्याचा शब्बाथ होय आणि तुम्ही स्वतःला नाकारले पाहिजे; हा कायमचा नियम होय.
    वचन ७ मधून
  • लेवीय १६:३

    “अहरोन पवित्रस्थानात अशाप्रकारे प्रवेश करेल: त्याने पापार्पणासाठी एक गोर्‍हा व होमार्पणासाठी एक मेंढा अवश्य आणावा.
    वचन ११ मधून
  • याकोब ४:८

    तुम्ही परमेश्वराजवळ या म्हणजे ते तुम्हाजवळ येतील. अहो पाप्यांनो, आपले हात धुवा आणि दुहेरी मनाचे जे आहेत त्यांनी आपली अंतःकरणे शुद्ध करावीत.
    वचन ७ मधून
  • याकोब ४:१०

    प्रभूसमोर तुम्ही स्वतःला नम्र करा आणि ते तुम्हाला उंच करतील.
    वचन ७ मधून
  • मत्तय ५:४

    धन्य आहेत ते, जे शोकग्रस्त आहेत, कारण त्यांना सांत्वन मिळेल.
    वचन ७ मधून
  • रोमकरांस ६:६

    आपल्याला माहीत आहे की आपला जुना स्वभाव त्यांच्याबरोबरच खिळला गेला व पापाच्या अधिकारात असलेले आपले शरीर निर्बल झाले म्हणून यापुढे आपण पापाचे गुलाम असू नये.
    वचन ७ मधून
  • जखऱ्याह १२:१०

    “मग मी दावीदाच्या घराण्यावर व यरुशलेमच्या सर्व रहिवाशांवर कृपेचा आणि विनंतीचा आत्मा ओतेन आणि ज्याला त्यांनी भोसकले त्या माझ्याकडे ते पाहतील आणि एकुलत्या एका पुत्रासाठी करावा, तसा ते त्याच्यासाठी शोक करतील आणि प्रथम पुत्रासाठी करावा, तसा ते त्याच्यासाठी विलाप करतील.
    वचन ७ मधून
  • लेवीय १६:५

    मग इस्राएली समुदायाकडून पापार्पणासाठी दोन बोकडे व होमार्पणासाठी एक मेंढा घ्यावा.
    वचन ११ मधून
  • 2 करिंथकरांस ७:९

    तुम्हाला दुःखी केले म्हणून नव्हे, तर त्या दुःखाने तुम्ही पश्चात्तापाकडे वळलात म्हणून मला आनंद वाटतो. तुमचे दुःखी होणे हे परमेश्वराच्या इच्छेनुसार झाले आणि यामुळे आमच्यामुळे तुमची कोणतीही हानी झाली नाही.
    वचन ७ मधून
  • 2 करिंथकरांस ७:११

    या दैवी दुःखाने तुमच्यामध्ये काय उत्पन्न केले आहे ते पाहा: किती उत्सुकता, तुम्हाला स्वतः स्पष्ट करण्याची उत्कंठा, किती संताप, किती भय, किती तळमळ, किती आस्था, किती न्याय मिळावा अशी इच्छा आणि या प्रत्येक गोष्टीत तुम्ही स्वतःस निर्दोष असे सिद्ध केले आहे.
    वचन ७ मधून
  • एज्रा ८:२१

    आम्ही अहवा कालव्याच्या किनारी असतानाच मी जाहीर केले की सर्वांनी उपवास करावा, म्हणजे आपल्या परमेश्वरासमोर आपण स्वतःला नम्र करून, त्यांनी आमचे व आमच्या मुलाबाळांचे व मालमत्तेचे प्रवासात संरक्षण करावे अशी प्रार्थना करावी.
    वचन ७ मधून
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options