Skip to content
मार्क १२:१८-२७

सदूकी पुनरुत्थानाविषयी प्रश्न करतात

मार्क १२:१८-२७

सदूकी पुनरुत्थानाविषयी प्रश्न करतात

१८
मग पुनरुत्थान नाही असे म्हणणारे सदूकी, आपला प्रश्न घेऊन त्यांच्याकडे आले.
१९
त्यांनी विचारले, “गुरुजी, मोशेने आपल्यासाठी असे लिहिले आहे की, एखादा मनुष्य मूलबाळ न होता मरण पावला, तर त्याच्या भावाने त्याच्या विधवेशी विवाह करून त्याच्यासाठी संतती वाढवावी.
२०
आता, सात भाऊ होते. त्यातील पहिल्याने लग्न केले परंतु संतती न होता तो मरण पावला.
२१
मग दुसर्‍या भावाने विधवेशी लग्न केले, पण तोही काही मूलबाळ न होताच मरण पावला. तिसर्‍याचेही तसेच झाले.
२२
ते सातही भाऊ मूलबाळ न होता मरण पावले. सर्वांच्या शेवटी ती स्त्री मरण पावली.
२३
आता पुनरुत्थान होईल त्यावेळी ती स्त्री कोणाची पत्नी होईल, कारण त्या सातही जणांनी तिच्याशी विवाह केला होता?”
२४
येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही चुकत नाहीत काय, कारण ना तुम्ही धर्मशास्त्र जाणता, नाही परमेश्वराचे सामर्थ्य ओळखता?
२५
जेव्हा मृत लोक उठतील, ते विवाह करत नाही किंवा विवाह करूनही देत नाही; तर ते स्वर्गातील देवदूतांप्रमाणे असतील.
२६
पण आता मृतांच्या पुनरुत्थानासंबंधी, मोशेच्या पुस्तकात जळत्या झुडूपांच्या संदर्भात वाचले नाही काय? परमेश्वराने त्याला असे सांगितले, ‘मी अब्राहामाचा परमेश्वर, इसहाकाचा परमेश्वर आणि याकोबाचा परमेश्वर आहे?’
२७
ते मृतांचे नसून जिवंतांचे परमेश्वर आहेत, तुम्ही फार मोठी चूक करत आहात.”

उताऱ्याचा अभ्यास

एका वचनावर नसून संपूर्ण उताऱ्यावर आधारित भाष्य.

शास्त्रात हे आणखी कोठे सांगितले आहे.

  • 2 तीमथ्य ३:१५

    लहानपणापासूनच पवित्रशास्त्र तुला माहीत आहे. हेच पवित्रशास्त्र ख्रिस्त येशूंमधील विश्वासाच्याद्वारे परमेश्वराचे तारण स्वीकारण्यासाठी तुला सुज्ञ करते.
    वचन २४ मधून
  • 2 तीमथ्य ३:१७

    यासाठी की, परमेश्वराचा सेवक पूर्णपणे प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा.
    वचन २४ मधून
  • योहान २०:९

    कारण त्यांनी मेलेल्यातून पुन्हा उठावे हा शास्त्रलेख तोपर्यंत त्यांना समजला नव्हता.
    वचन २४ मधून
  • मत्तय २२:२९

    येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही चुकत आहात, कारण ना तुम्ही धर्मशास्त्र जाणता, ना परमेश्वराचे सामर्थ्य ओळखता.
    वचन २४ मधून
  • इफिसकरांस १:१९

    जे विश्वास ठेवतात, त्यांना अमर्याद सामर्थ्य आहे. हे तेच महापराक्रमी सामर्थ्य आहे
    वचन २४ मधून
  • लूक २०:३५

    तरी, त्या युगात वाटेकरी होण्यासाठी आणि जे मृतांतून पुनरुत्थित होणार आहेत, ते लग्न करत नाही किंवा लग्न करूनही देत नाही.
    वचन २५ मधून
  • लूक २०:३६

    आणि ते मरणार नाहीत, कारण ते देवदूतांसारखे आहेत. ती परमेश्वराची लेकरे आहेत, कारण ती पुनरुत्थानाची लेकरे झाली आहेत.
    वचन २५ मधून
  • रोमकरांस १४:९

    ख्रिस्त याचसाठी मृत्यू पावले व पुन्हा जिवंत झाले की त्यांनी मेलेल्यांचा व जिवंतांचाही प्रभू असावे.
    वचन २७ मधून
  • प्रेषित १७:११

    आता बिरुया येथील यहूदी थेस्सलनीकातील लोकांपेक्षा थोर चरित्राचे होते, त्यांनी संदेश मोठ्या उत्सुकतेने ऐकला पौलाची विधाने खरी आहेत की नाहीत, हे ते प्रतिदिवशी वचनांची तपासणी करून पाहात असत.
    वचन २४ मधून
  • होशेय ६:२

    ते आम्हाला दोन दिवसात पुनरुज्जीवन देतील; तिसर्‍या दिवशी ते आम्हाला पुनर्स्थापित करतील, जेणेकरून आपण त्यांच्या उपस्थितीत जिवंत राहू शकू.
    वचन २४ मधून
  • यशायाह २५:८

    सर्वकाळासाठी ते मृत्यूला गिळून टाकतील. सार्वभौम याहवेह सर्वांच्या चेहऱ्यावरील अश्रू पुसून टाकतील; ते त्यांच्या लोकांची अप्रतिष्ठा सर्व पृथ्वीवरून काढून टाकतील. याहवेह असे बोलले आहेत.
    वचन २४ मधून
  • यिर्मयाह ३२:१७

    “हे सार्वभौम याहवेह, तुमच्या महान शक्तीने व विस्तारलेल्या भुजेने तुम्ही स्वर्ग व पृथ्वी निर्माण केली आहे. तुम्हाला अवघड असे काहीच नाही.
    वचन २४ मधून
All Mark Sites (Jerusalem)
All Mark Sites (Jerusalem) View full PDF
All Mark Sites (Levant)
All Mark Sites (Levant) View full PDF
The Last Week of Jesus' Life (With Reference Table)
The Last Week of Jesus' Life (With Reference Table) View full PDF

Map © Biblica Open Bible Maps · CC BY-SA 4.0

Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options