Skip to content
मार्क ११:१-१०

मार्क ११:१-१०

ते यरुशलेमजवळ आले आणि जैतून डोंगरावर असलेल्या बेथफगे व बेथानी या गावात आले, तेव्हा येशूंनी आपल्या शिष्यांपैकी दोन शिष्यांना असे सांगून पाठविले,
“समोरच्या गावात जा आणि तिथे शिरताच, ज्याच्यावर कधी कोणी स्वार झाले नाही असे एक शिंगरू बांधून ठेवलेले तुम्हाला आढळेल, ते सोडून इकडे आणा.
‘तुम्ही हे का करीत आहात?’ असे जर कोणी तुम्हाला विचारले, तर एवढेच म्हणा की, ‘प्रभूला त्याची गरज आहे आणि ते लगेच त्याला पाठवून देतील.’ ”
ते निघाले व त्यांना एका रस्त्यावर फाटकाच्या बाहेर शिंगरू बांधलेले आढळले. ते सोडू लागले,
त्यावेळी उभ्या असलेल्या काहींनी विचारले, “तुम्ही बांधलेल्या शिंगरूचे काय करत आहात?”
येशूंनी त्यांना सांगितल्याप्रमाणेच त्यांनी उत्तर दिले. तेव्हा त्या माणसांनी त्यांना जाऊ दिले.
जेव्हा त्यांनी ते शिंगरू येशूंकडे आणले आणि त्यावर बसण्यासाठी आपले वस्त्रे शिंगराच्या पाठीवर घातले, तेव्हा येशू त्यावर बसले.
अनेक लोकांनी आपले अंगरखे काढून रस्त्यावर पसरले आणि दुसर्‍यांनी शेतातून तोडून आणलेल्या डाहळ्या रस्त्यावर पसरल्या.
मग जे त्यांच्यापुढे गेले आणि जे त्यांच्यामागून चालले ते मोठ्याने ओरडून म्हणाले: “होसान्ना!” “प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो!”
१०
“आमचा पिता दावीदाचे येणारे राज्य आशीर्वादित होवो!” “सर्वोच्च स्वर्गात होसान्ना!”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options