Skip to content
यहोशुआ १३:१-६

यहोशुआ १३:१-६

जेव्हा यहोशुआ उतार वयाचा झाला, तेव्हा याहवेह त्याला म्हणाले, “तू आता खूप वयस्कर झाला आहेस आणि देशाचा बराच भाग ताब्यात घ्यावयाचा राहिला आहे.”
जे प्रदेश अजूनही बाकी होते ते हे: पलिष्टी आणि गशूरींचा सर्व प्रदेश;
पूर्व इजिप्तच्या शिहोर नदीपासून उत्तरेकडे असलेल्या एक्रोनच्या सीमेपर्यंत सर्व मिळून कनानी लोकांचा प्रदेश समजला जात असे, जरी इथे गाझा, अश्दोद, अष्कलोन, गथ आणि एक्रोन असे पाच पलिष्टी शासक होते; अव्वी लोकांचा प्रदेश:
दक्षिणेकडे कनानी लोकांचा सर्व प्रदेश; सीदोनी लोकांचा माराह, अफेक आणि अमोर्‍यांची सीमा इथपर्यंत आहे;
गिबली लोकांचा प्रदेश; बआल-गादपासून खाली हर्मोन पर्वत ते लेबो हमाथपर्यंत पूर्वेकडील सर्व लबानोन.
“लबानोनपासून मिसरेफोत-मयिम डोंगराळ प्रदेशात राहणारे सर्व रहिवासी, म्हणजे सर्व सीदोन्यांना मी स्वतः इस्राएली लोकांपुढून घालवून देईन. मी तुला सूचना दिल्याप्रमाणे इस्राएली लोकांना हा देश त्यांचे वतन म्हणून विभागून देण्यात येईल याची खात्री कर.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options