- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
लोक चुकीची भाकर शोधतात
योहान ६:२२-३४
लोक चुकीची भाकर शोधतात
२२
मग दुसर्या दिवशी सकाळी सरोवराच्या पलीकडच्या किनार्यावर लोकांचा समुदाय थांबला होता, तिथे केवळ एक होडी होती आणि येशू शिष्यांसहित त्यामध्ये गेले नव्हते, तरी शिष्य होडीत बसून निघून गेले होते.
२३
काही होड्या तिबिर्याहून ज्या ठिकाणी आभार मानून प्रभूने त्यांना भाकर खाऊ घातली होती त्या ठिकाणी आल्या.
२४
समुदायाच्या लक्षात आले की येशू आणि त्यांचे शिष्य तिथे नाहीत, हे पाहून ते नावेमध्ये बसून येशूंच्या शोधार्थ कफर्णहूमास निघाले.
मी जीवनाची भाकर आहे
२५
ते त्यांना सरोवराच्या पलीकडे भेटल्यावर, त्यांना म्हणाले, “गुरुजी, आपण येथे कधी आला?”
२६
येशूंनी त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो, मी जी चिन्हे केली, त्यामुळे नाही तर तुम्ही भाकरी खाल्या व तृप्त झाला म्हणूनच माझा शोध करीत आहात.
२७
नाशवंत अन्नासाठी कष्ट करू नका, तर जे अन्न सार्वकालिक जीवनासाठी टिकते व जे मानवपुत्र तुम्हाला देतो, ते मिळविण्यासाठी झटा, कारण परमेश्वरपित्याने आपल्या मान्यतेचा शिक्का त्यांच्यावर दिला आहे.”
२८
त्यावर त्यांनी विचारले, “असे कोणते काम करावे की ज्याची अपेक्षा परमेश्वर आम्हाकडून करतात?”
२९
येशू म्हणाले, “परमेश्वराचे कार्य हेच आहे: ज्यांना त्यांनी पाठविले त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा.”
३०
त्यावर ते म्हणाले, “आम्ही पाहून विश्वास ठेवावा असे आपणास वाटत असेल, तर आपण आम्हाला आणखी कोणती चिन्हे द्याल? आपण काय कराल?
३१
आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला व असे लिहिले आहे: ‘त्यांनी त्यांना खाण्यासाठी स्वर्गातून भाकर दिली.’”
३२
येशू त्यांना म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो, ज्यांनी तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिली तो मोशे नव्हता, परंतु माझा पिता जो स्वर्गातील खरी भाकर तुम्हाला देत आहे.
३३
ही परमेश्वराची भाकर आहे, जी स्वर्गातून उतरली आहे आणि जगाला जीवन देते.”
३४
ते म्हणाले, “प्रभूजी, हीच भाकर आपण आम्हाला नेहमी द्या.”
या उताऱ्यात
- कोण
- कोठे
- केव्हा
- About
हे देखील पहा
शास्त्रात हे आणखी कोठे सांगितले आहे.
कलस्सैकरांस ३:२
तुम्ही आपली अंतःकरणे स्वर्गीय गोष्टींकडे लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका.वचन २७ मधूनयशायाह ५५:२
जी भाकर नाही त्या अन्नपदार्थांवर व्यर्थ पैसे का खर्च करावे, आणि ज्याने समाधान होत नाही त्यासाठी कष्ट का करावे? ऐका, माझे ऐकून घ्या आणि जे चांगले आहे ते खा, आणि हे उत्तम अन्नपदार्थ खाऊन तुम्ही अत्यंत आनंदित व्हाल.वचन २७ मधून1 योहान ३:२३
ही त्यांची आज्ञा आहेः त्यांचा पुत्र येशू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवणे आणि त्यांनी आज्ञा दिल्याप्रमाणे एकमेकांवर प्रीती करावी.वचन २९ मधूनयोहान ६:५४
जो कोणी माझा देह खातो आणि माझे रक्त पितो, त्याला सार्वकालिक जीवन मिळते आणि मी त्यांना शेवटच्या दिवशी उठवेन.वचन २७ मधूनप्रेषित १६:३१
त्यांनी सांगितले, “प्रभू येशूंवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल.”वचन २९ मधून2 तीमथ्य २:१९
परंतु परमेश्वराने घातलेला पाया स्थिर आहे, त्यास शिक्का हा आहे: “जे प्रभूचे आहेत, त्यांना ते ओळखतात,” आणि “प्रभूचे नाव घेणार्यांनी अधर्मापासून दूर राहावे.”वचन २७ मधूनयोहान ६:४०
कारण माझ्या पित्याची इच्छा ही आहे की जे प्रत्येकजण पुत्राकडे पाहतात व त्याजवर विश्वास ठेवतात, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे आणि मी शेवटच्या दिवशी त्यांना उठवेन.”वचन २७ मधूनइब्री ५:९
आणि परिपूर्ण केल्यामुळे, त्यांच्या आज्ञा मानणार्या सर्वांचे अनंतकाळचे तारणकर्ता झाले,वचन २९ मधूनयोहान ६:५१
मी ती स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे. जे कोणीही भाकर खातील, ते सदासर्वकाळ जगतील. ही भाकर माझे शरीर आहे, जी जगाच्या जीवनासाठी मी देणार आहे.”वचन २७ मधूनरोमकरांस ६:२३
कारण पापाचे वेतन मरण आहे, पण परमेश्वराचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे.वचन २७ मधूनयोहान ३:३६
जो कोणी पुत्रावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन आहे; परंतु जो कोणी पुत्राला नाकारतो, तो जीवन पाहणार नाही, पण परमेश्वराचा क्रोध त्याच्यावर राहील.वचन २९ मधूननहेम्याह ९:१५
ते भुकेले असताना त्यांना स्वर्गातून भाकर दिली आणि तहानलेले असताना खडकातून पाणी दिले; तुम्ही त्यांना आज्ञा दिली की, त्यांनी जावे व जी तुम्ही बाहू उभारून वचनदत्त केली होती, त्या भूमीचा ताबा घ्यावा.वचन ३१ मधून
हे कोठे घडते



अभ्यास टीप
Settings