Skip to content
योहान ६:१६-२१

योहान ६:१६-२१

१६
संध्याकाळ झाल्यावर, त्यांचे शिष्य खाली सरोवराकडे गेले,
१७
ते होडीत बसून सरोवरा पलीकडे कफर्णहूमास जाण्यास निघाले. रात्र झाली तरी येशू यद्यपि त्यांच्याकडे परतले नव्हते.
१८
परंतु वादळी वारा सुटला व लाटा खवळून वाहू लागल्या.
१९
ते तीन किंवा चार मैल अंतर वल्हवून गेले असतील, तोच त्यांना येशू होडीकडे पाण्यावरून चालत येताना दिसले, तेव्हा ते फार घाबरले.
२०
परंतु ते त्यांना म्हणाले, “मीच आहे; भिऊ नका.”
२१
ते येशूंना होडीत घेण्यास तयार झाले आणि लागलीच ती होडी जिथे त्यांना जायचे होते त्या किनार्‍यास पोहोचली.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options