- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
येशूला ठार मारण्याचा कट
योहान ११:४५-५३
येशूला ठार मारण्याचा कट
४५
यामुळे मरीयेला भेटावयास आलेल्या अनेक यहूद्यांनी येशूंनी जे केले ते पाहिले व त्याजवर विश्वास ठेवला.
४६
परंतु काहीजण परूश्यांकडे गेले आणि येशूंनी काय केले ते त्यांना सांगितले.
४७
मग मुख्य याजकांनी व परूश्यांनी न्यायसभा बोलावली. ते विचारू लागले, “आपण काय साध्य केले आहे? या ठिकाणी हा मनुष्य अनेक चिन्हे करीत आहे.
४८
जर आपण त्याला असेच करत राहू दिले, तर प्रत्येकजण त्याच्यावर विश्वास ठेवेल आणि रोमी येतील व आपले मंदिर व आपले राष्ट्र दोन्ही ताब्यात घेतील.”
४९
त्यांच्यापैकी कयफा नावाचा मनुष्य त्या वर्षी महायाजक होता, तो म्हणाला, “तुम्हाला काहीच माहीत नाही!
५०
तुम्ही हे देखील लक्षात आणत नाही की, संपूर्ण राष्ट्राचा नाश होणे यापेक्षा लोकांसाठी एका मनुष्याने मरावे हे तुमच्या हिताचे आहे.”
५१
हे तो आपल्या मनाचे बोलला नाही, त्या वर्षाचा महायाजक म्हणून त्याने भविष्य केले की, येशू यहूदी राष्ट्राकरिता मरणार आहेत,
५२
हे केवळ इस्राएली राष्ट्रासाठीच नव्हे, तर परमेश्वराच्या सर्व पांगलेल्या मुलांना एकत्र आणावे आणि एक करावे यास्तव.
५३
मग त्या दिवसापासून त्यांनी त्याला जिवे मारण्याचा कट केला.
उताऱ्याचा अभ्यास
एका वचनावर नसून संपूर्ण उताऱ्यावर आधारित भाष्य.
- कोण
- कोठे
- केव्हा
- About
शास्त्रात हे आणखी कोठे सांगितले आहे.
योहान १०:१६
माझी आणखी काही मेंढरे आहेत, पण ती या मेंढवाड्यातील नाहीत. त्यांनासुद्धा मी माझ्या मेंढवाड्यात आणलेच पाहिजे. ते सुद्धा माझी वाणी ऐकतील आणि मग एक कळप आणि एक मेंढपाळ असे होईल.वचन ५२ मधूनमत्तय २६:३
नंतर प्रमुख याजकवर्ग आणि लोकांचे वडीलजन महायाजक कयफाच्या राजवाड्यात एकत्र जमले.वचन ४७ मधूनयोहान १८:१४
याच कयफाने यहूदी पुढार्यांसोबत अशी मसलत केली होती की, लोकांसाठी एका मनुष्याने मरावे हे हिताचे आहे.वचन ४९ मधून1 योहान २:२
तेच आपल्या पापांसाठी प्रायश्चिताचा यज्ञ आहेत आणि केवळ आपल्यासाठीच नाही तर सर्व जगाच्या पापांसाठीसुद्धा आहेत.वचन ५२ मधूनयशायाह ४९:६
ते म्हणतात, “याकोबाच्या कुळांना पुनर्स्थापित करणे आणि माझ्या अवशिष्ट इस्राएलच्या लोकांना परत आणणे, हे करण्यासाठी माझा सेवक होणे, हे काम फारच लहानसे आहे, तर पृथ्वीच्या दिगंतापर्यंत माझे तारण पोचवावे यासाठी मी तुला गैरयहूदीयांसाठी त्यांचा प्रकाश व्हावा असेही करेन.”वचन ५२ मधूनयोहान २:२३
वल्हांडणाच्या उत्सवात येशू यरुशलेमात असताना, अनेक लोकांनी त्यांच्याद्वारे घडत असलेली चिन्हे पाहिली व त्यांच्या नावावर विश्वास ठेवला.वचन ४५ मधूनयोहान ११:१९
आणि अनेक यहूदी लोक मार्था व मरीया यांच्या भावाचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे सांत्वन करण्यासाठी आले होते.वचन ४५ मधून1 पेत्र १:१
पेत्र, येशू ख्रिस्ताच्या प्रेषिताकडून,वचन ५२ मधूनइफिसकरांस १:९
त्यांनी ख्रिस्तामध्ये त्यांच्या इच्छेचे रहस्य त्यांच्या उद्देशानुसार आपल्याला कळविले आहे.वचन ५२ मधूनइफिसकरांस १:१०
ही योजना काळाच्या पूर्णतेची होती, यासाठी की स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सर्वगोष्टी ख्रिस्तामध्ये एकत्र व्हाव्या.वचन ५२ मधूनदानीएल ९:२६
बासष्ट ‘सप्तके’ हा काळ संपल्यावर अभिषिक्ताचा वध करण्यात येईल आणि त्याला काही उरणार नाही. मग अधिपतीचे लोक शहराचा आणि पवित्रस्थानाचा विध्वंस करतील. शेवट महापुराप्रमाणे येईल: शेवट होईपर्यंत युद्ध चालू राहील आणि सर्वकाही ओसाड व्हावे असे ठरले आहे.वचन ४८ मधूनयोहान ११:५१
हे तो आपल्या मनाचे बोलला नाही, त्या वर्षाचा महायाजक म्हणून त्याने भविष्य केले की, येशू यहूदी राष्ट्राकरिता मरणार आहेत,वचन ४९ मधून



अभ्यास टीप
Settings